आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड, जाळपोळ प्रकरणी आमदार राणा यांना दंड, कोठडी; तिवसा आंदोलन प्रकरणी न्यायालयाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा - आघाडी सरकारच्या काळात सन २०१२ मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी तिवसा येथे केलेल्या आंदोलनादरम्यान जाळपोळ आणि बसची तोडफोड केली होती. याप्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी आमदार रवी राणा यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

 

शेतमालाला भाव मिळावा यासाठी आमदार राणा यांनी तिवसा येथे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान राणा यांनी जाळपोळ आणि बसची तोडफोड केली होती. याप्रकरणी आमदार राणा यांच्यासह एकूण ३९ जणांवर भादंविच्या कलम १४३, १४७,१४९,३४१,४२७ व भादंविच्या १३ पीडी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले होते. त्याच अनुषंगाने गेल्या सहा वर्षापासून रवी राणा व शेतकरी, कार्यकर्ते हजर न झाल्याने न्यायालयाने ३९ जणांविरुद्ध अटक वाॅरंट काढला होता. याप्रकरणी आज रवी राणा यांच्यासह ३९ जणांना न्यायालयाने ५०० रुपये दंड स्वरूपात भरण्याचे आदेश दिले. परंतु रवी राणासह २८ जणांनी दंड भरण्यास नकार दिला. आरोपींपैकी ७ जणांनी दंड भरला, तर चार जण गैरहजर होते. राणा यांनी दंडास नकार दिल्याने आज तिवसा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर यांनी राणासह अन्य २८ जणांना १२ फेब्रुवारीपर्यंत सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...