आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर चाकू मारून उकळले पैसे; चाैघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील मुधोळकर पेठमध्ये अभिराज अमोलसिंग येवतीकर (२४) यांचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये २८ जूनला एक चारचाकी गाडी वॉशिंगसाठी आली होती. गाडी वॉशिंग झाल्यानंतर घेऊन जाण्यासाठी ऋषिकेश देशमुख नामक व्यक्ती आला. या वाहनात बॅटरी नाही, असे सांगून देशमुख निघून गेले. त्यानंतर समीर शहा, दर्शन कुलकर्णी, अनिकेत झाडे, कपिल भाटी हे चौघे गॅरेजवर आले व त्यावेळी समीरने येवतीकर यांना म्हटले की, मी बॅटरी चोर नाही, चाकू मारणारा आहे, असे म्हणत त्याने स्वत:च्या हातावर चाकू मारला. समीरसोबत असलेल्यांनी येवतीकरला जबरीने ८ हजार ७३० रुपये मागितले. त्यानंतर २९ जूनला गॅरेजवर येऊन १० हजारांची मागणी केल्याचा आरोप येवतीकरने केला.

 

बातम्या आणखी आहेत...