आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण विदर्भात मान्सूनचे आगमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/अकोला- येत्या २४ तासात म्हणजे उद्या शनिवार ९ जून रोजी विदर्भाच्या दक्षिण भागात म्हणजे वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या पुढच्या २४ तासात म्हणजे ११ जूनपर्यत उर्वरित िवदर्भात मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक ए. डी. ताथे यांनी दिली. शुक्रवार, ८ जून रोजी दक्षिण गडचिरोलीच्या खालच्या टोकाला म्हणजे सिरोंचा येथे मान्सूनने स्पर्श केला आहे. मान्सून लिमिट येत्या २४ तासात वाढत जाऊन सर्वत्र मान्सूनचे आगमन होईल, असे ताथे म्हणाले. 


गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी नागपूरसह विदर्भात येणाऱ्या पावसामुळे तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. िवदर्भातील तापमान एकदम ४० ते ४२ अंश सेल्सियस इतके खाली आले आहे. त्यामुळे गर्मीपासून दिलासा मिळालेला असला तरी उकाडा कायम आहे. परंतु मान्सूनच्या आगमनानंतर उकाडाही जाणवनार नाही. मान्सून दोन ठिकाणाहून सक्रिय होतो. अरेबीयन समुद्रातून वारे तीव्र राहिले तर आधी मान्सून कोकणात येतो. तिथून मुंबई आणि त्या नंतर विदर्भात येतो. तर बंगालच्या खाडीत वारे तीव्र राहिल्यास आंध्र व तेलंगणाकडून विदर्भात पाऊस येतो. विदर्भात साधारणत: बंगालच्या खाडीतूनच मान्सून येतो, असे प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक ए. डी. ताथे यांनी सांगितले. विदर्भात मान्सून सक्रिय झाल्याच्या गेल्या सात आठ वर्षातील तारखा पाहिल्यास १० ते १५ जून या कालावधीत मान्सून सक्रिय होतो. गेल्या २५ ते ३० वर्षात एकदाच ७ जूनला मान्सून सक्रिय झाला होता. अगदी २४ व २८ जूनलाही पाऊस आलेला आहे. पण यावर्षी मात्र पाऊस ८ ते ११ जून दरम्यान येईल, असे ताथे यांनी स्पष्ट केले. सलग दोन दिवस २.५० मि. मी.च्या वर पावसाची नोंद झाल्यास मान्सून जाहीर करण्यात येतो.

 

बातम्या आणखी आहेत...