आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर विभागीय मंडळाच्या निकालात मुलीच नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार ८ जून रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. नागपूर विभागाचा निकाल ८५.९७ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी २.३ टक्क्यांनी वाढली असून विभागातून गोंदिया जिल्ह्याने निकालात बाजी मारली. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात आघाडी कायम ठेवली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ८९.३१ इतकी आहे. 


नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. या परीक्षेकरिता नागपूर विभागातून १ लाख ७१ हजार ३६४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ७० हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले. यापैकी १ लाख ४६ हजार ४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षाच्या विभागाच्या एकूण निकालाची टक्केवारी ८३. ६७ टक्के इतकी होती. यावर्षी त्यात २.३ टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्याचा निकाल हा ८७.५५ तर सर्वात कमी निकाल वर्धा जिल्ह्याचा ८३.६४ टक्के आहे. 


निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता येत्या २८ जूनपर्यंत विहित शुल्क भरून विद्यार्थी याकरिता अर्ज करू शकतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...