आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिली 'डिजिटल चार्जशिट' कोर्टात दाखल, नागपूर पोलिसांना मिळाला बहुमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशातच डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागले आहे. अशातच हायटेक आणि स्मार्ट अशी ओळख असलेल्या नागपूर पोलिसांनी राज्यातील पहिली डिजिटल चार्जशिट कोर्टात दाखल करण्या बहुमान पटकविला आहे. शहरातील यशोधरानगर पोलिस ठाण्याला हा मान मिळाला आहे. याबद्दल पोलिस आयुनक्त डाॅ. के व्यंकटेशम यांनी पोलिस स्टेशनचे निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार शेरु एली मेहबूब अली याची  9 मार्चच्या रात्री 12 वाजता गांजाची पाकिटे चोरल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गोलू उर्फ कुणाल विद्याधर कांबले राहुल भीमराव इंगळे व कुणाल नरेंद्र वाघमारे यांना अटक केली होती. 

 

पोलिसांनी या प्रकरणात सुरवातीपासूनच प्रथमी खबरी अहवाल, घटनास्थळ, पंचनामा आरोपींचा कबुलीजबाब, जप्ती पंचनामा साक्षीदारांचे जबाब आदींसह संपूर्ण तपासाचे चित्रीकरण केले. संपुर्ण गुन्ह्याचे कागदपत्र दोषारोपापत्राच्या चित्रीकरणासह डिजिटल चार्जशिट मंगळवारी कोर्टात दाखल केली. यात यशोधरानगर पोलिसांना पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे, अतिरिक्त पोलिस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त सुहास बावचे, यांचे मार्गदर्शन मिळाले. 

बातम्या आणखी आहेत...