आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनाम्यानंतर नाना पटोले यांची आता \'पश्चाताप यात्रा\', 22 डिसेंबरपासून राज्यभरात दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या धोरणांवर जाहीर टीका करणारे आणि नुकताच खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांनी पश्चाताप यात्रेचे आयोजन केले आहे. पटोले येत्या 22 डिसेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहे. दरम्यान, पटोले यांनी 8 डिसेंबरला खासदारकी व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

 

2009 मध्ये राज्यातील तत्कालीन काँग्रेस नेतृत्त्वावर अशीच टीका करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाआडून टीका करत त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पटोले यांनी “राज्य सरकारने शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वासघात केला आहे’, अशी टीका करत त्यांनी पक्ष सोडताच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी त्यांची भेट घेऊन बंद दरवाज्यात चर्चा केली होती. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

 

म्हाणले होते... मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही
 नाना पटोले यांनी राजधानी दिल्लीत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या कार्यालयात खासदारकीचा राजीनामा सादर दिला होता. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे पाठवून दिला आहे. नंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

‘देशातील सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी साेडवण्यात अपयशी ठरले अाहे. मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही. जनतेची कामेच होत नसतील तर पदावर राहण्यात काय अर्थ? सरकार एेकत नसेल तर साेबत राहून काम करण्यात काय अर्थ अाहे? त्यापेक्षा पुन्हा जनतेत जाऊन काम केले पाहिजे, असे मला वाटले म्हणून मी राजीनामा दिला,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार अापले असले म्हणून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचे मी कदापि समर्थन करणार नाही. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालोय. कुण्या नेत्याच्या उपकाराने नाही, असा टोला त्यांनी मोदींचे नाव न घेता मारला.

 

अशी आहे नाना पटोले यांची कारकीर्द
- 1992 मध्ये सानगडी क्षेत्रातून अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले.
- काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभेच्या 1999 व 2004 अशा दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या.
- 2008 मध्ये त्यांनी नेतृत्वावर टीका करत काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली हाेती.
- 2009 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा लढवली. मात्र, ते निवडून येऊ शकले नाहीत. जुलै 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- 2009 मध्ये साकोलीमधून भाजपकडून ते विजयी झाले. पुढे 2024 मध्ये भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा त्यांनी भंडारा मतदारसंघात पराभव केला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून  वाचा...  मात्र खरे कारण वेगळेच...

 

बातम्या आणखी आहेत...