आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मी नागपुरमधून निवडणूक लढवणार, खासदार नाना पटोलेंची गडकरींंना भिडण्‍याची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 'पक्षाने संधी दिली तर मी नागपूरमधून निवडणूक लढण्‍यास तयार आहे. मी गडकरी किंवा फडणवीस कोणाविरोधातही निवडणूक लढवू शकतो. मी केवळ निवडणूकच लढवणार नाही तर त्‍यांना हरवून जनता कोणासोबत आहे हेही दाखवून देईल', अशी गर्जना खासदार नाना पटोलेंनी एका वृत्‍त वाहिनीला मुलाखत देताना केली आहे. 

 

फडणवीस कधी समोरासमोर निवडून आले नाहीत 
मुलाखतीमध्‍ये नाना पटोले यांनी गडकरी व फडणवीस यांच्‍यावर हल्‍लाबोल केला आहे. 'लोकांची पसंती कोणाला आहे, हे मी दाखवून दिल आहे. नागपूरमध्‍ये मी गडकरींचा सहज पराभव करू शकतो. राज्‍याचे मुख्‍यमंत्री फडणवीस कधीही समोरासमोर निवडून आले नाही. ते नेहमी मतविभाजनाचा फायदा घेत निवडून आले आहेत. मात्र आता हे चालणार नाही. ते आता नापास होतील. पक्षाने आदेश दिला तर मी नागूपरमध्‍ये कोणाविरोधातही निवडणूक लढण्‍यास तयार आहे.', अशी गर्जना नाना पटोलेंनी केली आहे.  

 

देशात व राज्‍यात काँग्रेसची सत्ता परत येईल 
नाना पटोले यांनी सरकारवर नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी, कृषी धोरण यांवरून चांगलेच ताशेरे ओढले. 'भाजप सत्तेवर आल्यापासून त्यांनी लोकांना काय वागणूक दिली, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लोक त्यांना निवडून देणार नाहीत. आगामी निवडणुकांमध्‍ये राज्‍यात व देशात काँग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील सरकार स्‍थापन होईल', असा विश्‍वास नाना पटोलेंनी व्‍यक्‍त केला आहे. मोदी सरकारच्‍या आदिवासी व कृषी धोरणाच्‍या नाराजीवरून नाना पटोलेंनी भाजपची साथ साडली होती. तसेच मोदी हे लोकप्रतिनिधींना वेळ देत नाही, तसेच त्‍यांचे म्‍हणणेही ऐकून घेत आहे, अशी टीका त्‍यांनी केली होती. 

 

भाजपला कोंडीत पकडण्‍यासाठी काँग्रेसचे प्रयत्‍न
आगामी लोकसभा व राज्‍यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आतापासूनच वाजण्‍यास सुरूवात झाली. देशभरातील सहकारी पक्षांचा पाठिंबा मिळावा म्‍हणून भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा यांनी देशातील विविध राजकीय नेत्‍यांच्‍या भेटीगाठी सुरू केल्‍या आहेत. त्‍यादृष्‍टीने काँग्रेसनेही प्रयत्‍न सुरू केले असून नागपूरमधून खासदार नाना पटोले यांना उमेदवारी देणे, म्‍हणजे भाजपला आतापासूनच कोंडीत पकडण्‍याच्‍या प्रयत्‍नांचा एक भाग असल्‍याचे म्‍हटले जात आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...