आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत पुन्हा धुमाकूळ; लाकडाच्या डेपोला लावली आग, वाहतूक केली बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली-  गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात चकमकीत नक्षलवाद्याचां खात्मा केल्यानंतर चिडलेल्या नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या आल्लापल्ली भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पहाटे वनविभागाच्या तलवाडा येथील लाकडाच्या डेपोला आग लावली असून पोलिस व वनविभागाच्या निषेधाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच आल्लापल्ली -भामरागड मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. 

 

आलापल्ली पासून 12 किलोमीटरवर असलेल्या तलवाडा या गावाजवळील आलापल्ली वनपरिक्षेत्राचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास जाळला.  या डेपोत मोठ्या प्रमाणात बिट म्हणजेच जळाऊ लाकूड उपलब्ध आहे. या आगीत अंदाजे 23 बिट जळाले असून जवळपास 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  वन परिक्षेत्र अधिकारी किरण पाटील हे स्वतः तिथे पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. 

 

नक्षलवाद्यांनी तलवाडापासून सुमारे 2 किमी अंतरावर मुख्य मार्गावर एक झाड पाडून वाहतूक बंद केली आहे. एवढेच नाही तर याच मार्गावर भामरागडच्या अलिकडे ताडगावजवळही अशाच प्रकारे झाड पाडून बॅनर लागले आहे. त्यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...