आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीमध्‍ये नक्षलवाद्यांनी बीएसएनएलचे टॉवर जाळले, आज भारत बंदचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली- नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्‍ह्यातील एटापल्‍ली तालुक्‍यामधील बीएसएनएलच्‍या टॉवरला आग लावून बीएसएनएलची संपूर्ण यंत्रणा नष्‍ट केली आहे. आज मंगळवारी, 12 डिसेंबर रोजी नक्षलवाद्यांनी भारतबंदचे आवाहन केले आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर एटापल्‍ली तालुक्‍यातील रोपी गावात असलेली बीएसएनएलची यंत्रणा नक्षलवाद्यांनी जाळून खाक केली. नंतर या भागात भारत बंद आवाहनाचे बॅनर लावून नक्षलवाद्यांनी या बंदमध्‍ये सहभागी होण्‍याचे नागरिकांना आवाहन केले.

 

रविवारी रात्री 10 वाजेच्‍या सुमारास नक्षलवाद्यांनी हे कृत्‍य केले. त्‍यानंतर टॉवरचे सिग्नल मिळत नसल्यामुळे बीएसएनएलच्या गडचिरोली कार्यालयाने सोमवारी सकाळी आपल्या अभियंत्याला पाहणीसाठी पाठविले. तेव्‍हा ही घटना उघडकीस आली. बीएसएनएलच्‍या अधिका-यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्‍थळी येत नक्षलवाद्यांचे बॅनर काढून टाकले.

 

बातम्या आणखी आहेत...