आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीला प्रेमात फसवून दुसरीशी केले लग्न, Honeymoon एेवजी कोठडीत झाली रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एकीशी प्रेम करून दुसरीसोबत बोहल्यावर चढणा-या नवरदेवाला हनीमुन एेवजी जेलची खावी लागली. पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. नवरदेवाला अटक करताच त्याच्या कुटुंबियांना आणि पत्नीलाही धक्का बसला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल संजय मेश्राम (29) याच्याविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पीडित तरुणी ही मूळची बुटीबोरीची असून नागपुरात एका कंपनीत नोकरी करते. आरोपी हा बारावी शिकलेला असून स्वत:चा व्यवसाय करतो. भांडे प्लॉट परिसरात राहात असताना आरोपी व पीडित मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध जोडले.  याच काळात त्याने दुसऱ्या मुलीशी विवाहगाठही जोडली. याची माहिती पीडितेला मिळाल्यावर तिने नंदनवन बसस्थानक परिसरात विष प्राशन केले व त्याची माहिती मैत्रिणीला दिली. तिची मैत्रीण भांडे प्लॉट येथील एका वसतिगृहात राहाते. ती ताबडतोब पीडित मुलीजवळ पोहोचली. 

 

तिने सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ठाकरे, यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. तरुणीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. कोतवाली पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल करून प्रकरण नंदनवन पोलिसांकडे वर्ग केले. 

बातम्या आणखी आहेत...