आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आज ठरणार, दुपारी दोन वाजता निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी नागपुरात होत आहे. सकाळी ११ वाजता मतमोजणी सुरू होऊन दुपारी दोनपर्यंत निकाल येईल. या वर्षी ८९६ सदस्यांचे मतदान झाले. 


िवदर्भातून कथा व कादंबरीकार रवींद्र शोभणे, समीक्षक डाॅ. किशोर सानप, पुण्यातून कथा व कादंबरीकार राजन खान व ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर, मराठवाड्यातून माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उमेदवार आहेत. यात देशमुख व शोभणे यांच्यात चुरशीची लढत आहे. बडोदा मराठी वाङ््मय परिषद व बडोदा साहित्य परिषद या आयोजक संस्थांची मतेही दोघांत विभागली गेली आहे. मात्र िवदर्भाचे डाॅ. अक्षयकुमार काळे पूर्वी अध्यक्ष झालेले असल्याने या वेळी मराठवाड्याला संधी द्यावी, असा मतप्रवाह प्रबळ आहे.

बातम्या आणखी आहेत...