आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचही झोनमध्ये महिला मिनी महापौर, सलग दुसऱ्या वर्षी ही झोन सभापतीपदांवर 'महिलाराज'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेच्या पाच ही झोनमध्ये पाच ही महिला मिनी महापौरपदी निवडून आल्या आहेत. महिलांना संधी मिळाल्याने पाच ही झोनमध्ये महिलाराज आले आहे. दोन भाजप, दोन काँग्रेस तर एका जागेवर शिवसेनेच्या मिनी महापौर पदावर बुधवार ,दि. ११ एप्रिल रोजी अविरोध निवडीची संधी मिळाली. 

 

झोन क्रमांक १ कृष्णानगरच्या सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वंदना मडघे, झोन क्रमांक २ राजापेठच्या सभापती म्हणून भाजपच्या जयश्री डहाके अविरोध निवडूण आल्या. झोन क्रमांक ३ हमालपुराच्या झोन सभापती म्हणून काँग्रेसच्या शोभा शिंदे आणि झोन क्रमांक ५ भाजीबाजार झोनच्या सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनिता भेले अविरोध निवडून आल्या. बडनेरा झोन क्रमांक ४ च्या सभापती म्हणून अर्चना धामणे यांची दुसऱ्यांचा निवड झाली आहे. सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया आरंभ झाली. एकानंतर एका झोनमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळेस पाच ही झोनमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप महापालिकेत सत्तेवर आला. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत पाच ही मिनी महापौरपदी महिलांना संधी देण्यात आली होती. सलग दुसऱ्या वर्षी यंदा देखील झोन सभापती पदी महिलांना संधी देण्यात आली आहे. सर्वाधिक सदस्य असलेल्या रामपुरी कॅम्प आणि राजापेठ झोनमध्ये भाजपने या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले, तर बडनेरा युतीत असलेल्या शिवसेनेला संधी दिली. मात्र प्राबल्य कमी असलेल्या हमालपुरा आणि भाजीबाजार या झोनमध्ये भाजपला मिनी महापौर पदावर संधी मिळाली नाही. मागील वर्षी हमालपुरा झोनमध्ये बसपाला तर भाजीबाजार झोनमध्ये एमआयएमला संधी मिळाली होती. यंदा या दोन्ही झोनमध्ये मिनी महापौर काँग्रेसने स्वत:कडे ठेवले. बहुमत असल्याने भाजपमध्ये पदांकरिता नगरसेवकांमध्ये प्रचंड रस्सीखेच दिसून आहे. झोन सभापती पदाकरीता देखील पक्षांतर्गत कुरघोडी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. झोन सभापती पदानंतर काही दिवसांमध्येच विविध विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. आगामी सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची नावे घोषित केली जाणार आहे. समित्यांवर सदस्यांची नावे आल्यानंतर सभापती आणि उपसभापती पदाकरीता मोर्चेबांधणी होणार असल्याचे चित्र आहे. 

बडनेरात धामणेंना पुन्हा संधी 
बडनेरा झोनच्या सभापती म्हणून शिवसेनेच्या अर्चना धामणे यांची अविरोध निवड करण्यात आली. मिनी महापौर म्हणून शिवसेनेकडून त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली. बडनेरात शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले आहे. एक झोन सभापती तर दुसरे ललित झझांड यांना स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...