आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक हाेण्याचा मार्ग माेकळा, खंडपीठाने याचिका फेटाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला. लाेकसभेची मुदत संपण्यास अवघे एक वर्ष बाकी असताना निवडणुकाचा हा  अनावश्यक खर्च टाळून पोटनिवडणूक न घेण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात अाली हाेती. खंडपीठाने ती बुधवारी फेटाळून लावली.   


भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, सार्वत्रिक निवडणुका पुढच्याच वर्षी असल्याने पोटनिवडणूक घेणे अनावश्यक ठरेल, तसेच त्यावर होणारा खर्चही अनावश्यक ठरेल. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. माजी खासदार नाना पटोले यांनी २०१४ च्या निवडणुकीत ६ कोटी २८ लाख रुपये खर्च करून आदर्श निवडणूक संहितेचा भंग केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता.


या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुढील आदेशापर्यंत निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...