आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी आता व्‍यक्‍ती घटक मानणार- राज्‍यमंत्री गुलाबराव पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती घटक मानण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत दिली.


सदस्य प्रकाश आबिटकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, कर्जमाफी योजनेंतर्गत 58 लाख खातेदार असून आतापर्यंत 15 हजार 882 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेंतर्गत कुटुंब या घटकाऐवजी व्यक्ती हा घटक मानण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, या जिल्ह्यातील 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. त्यापैकी 1 लाख 88 हजार खातेदारांना 377 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित 82 हजार शेतकऱ्यांच्या ऑनलाईन माहितीत त्रुटी असल्याने रक्कम जमा झालेली नाही. या त्रुटींची पुर्तता करुन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार, दिपक चव्हाण, किशोर पाटील, चंद्रदीप नरके, शंभूराजे देसाई, समीर कुणावार यांनी भाग घेतला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...