आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारीत दरामुळे साधी एसटी, शिवशाही महागली; प्रवाशांच्या खिशाला फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- एसटीच्या सुधारित दरामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असून नागपूरसाठी साध्या एसटीचे तिकीट ३०, तर शिवशाही एसी बसचे तिकीट ४३ रुपयांनी महागले आहे. साध्या एसटीच्या तिकीट दरात टप्प्याला १.१५, तर शिवशाहीच्या १.६० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या भाडेवाढीवरून नाराजी व्यक्त केली आहे. 


आधी साध्या बसचा प्रत्येक टप्प्याला ६.३० रुपये दर होता. आता तो ७.४५ रुपये करण्यात आला असून, शिवशाहीमध्ये प्रवास करताना प्रत्येक टप्प्याला आधी ८.९५ रुपये लागायचे आता प्रत्येक टप्प्याला १०.५५ रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. 


नव्या दरानुसार साध्या एसटीतून प्रवास करण्यासाठी १९४.७ रुपये अर्थात १९५ रुपये तिकीट दर आकारला जात आहे. एसटीने प्रत्येक प्रकारातील गाड्यांची आरामदायकपणानुसार दरवाढ केली आहे. जलद सेवेसाठी प्रत्येक टप्प्याला (प्रति ६ कि.मी.) ७.४५ रुपये आकारले जातील. निमआराम सेवेसाठी १०.१० रुपये, शिवशाही वातानुकुलीतसाठी १०.५५ रु., शिवशाही स्लीपर कोचसाठी १५.२० रुपये आकारले जाणार आहेत. अर्थात कोणत्याही प्रवासात ६ किमी.चा एक टप्पा यानुसार एकूण किती टप्पे येतात त्याला नव्या दराने गुणल्यानंतर त्यात जीएसटीचे ५ टक्के मिळवून एकूण तिकिटाची रक्कम ठरणार आहे. त्यामुळे आता एसटीचाही प्रवास महागला आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 

अशी झाली एकूण दरवाढ 
एसटीनुसार ६ किमीचा एक टप्पा असतो. शिवशाहीने नागपूरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रत्येक टप्प्याचा सुधारित दर १०.५५ रुपये गुणिले २६ टप्पे असे एकूण २७४.३० रु. होतात. यात प्रवासी कराचे १५.८६ रुपये आधीच मिळवले आहेत. ५ टक्के जीएसटी आकारताना प्रवासी कराचा विचार केला जात नाही. अर्थात २७४.३० रुपयांतून १५.८६ रुपये वजा करून २५८.४४ रुपयांवर ५ टक्के जीएसटी. २७४.३० + जीएसटी १२.९२ रुपये + अपघात निधी १ रुपये असे एकूण नागपूरसाठी २८८.६० पैसे तिकीट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...