आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्खे मेळघाटच आगीच्या निखा-यावर, अदिवासींच्या वर्गणीतूनच पेटल्या चुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी/परतवाडा - दरवर्षी आगीच्या घटनांमुळे मेळघाटातील आदिवासींचे संसार जळत असले तरी प्रचंड विस्तार असलेल्या मेळघाटात आग विझवण्यासाठी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे भीषण वास्तव सेमाडोह येथील आगीच्या घटनेनंतर चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान सेमाडोह येथील आगग्रस्त कुटुंबियांसाठी आदिवासींच्या प्रथेनुसार गावागावांत २५ रुपये वर्गणी व धान्य गोळा करून पीडितांपर्यंत पोहचवण्यात आले. 


मेळघाटात आगीच्या घटना दरवर्षी नित्याच्या झाल्या आहेत. यापूर्वीही धरणमहू, दिदंम्बा, मोगर्दा, बिजूधावडी, पाटीया आदी गावांना आगी लागून गावेच बेचिराख झाल्याच्या घटना ताज्याच आहेत. मेळघाटातील बहुतांश घरे कुड व मातीची आहेत. त्यातच गावे दुर्गम भागात असून शेकडो छोट्याछोट्या वस्त्या आहेत. बहुतांश गावांमध्ये पाण्याच्या सुिवधा नसल्यामुळे आग लागल्यास त्या विझवाव्या कशा असा प्रश्न नित्याचा आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यात गेल्या महिण्याभरात आगीच्या घटनेत अनेक संसार उद््ध्वस्त झाले आहेत. 
चिखलदरा तालुक्यातील बेलखेडा, गडकाभांडुम येथे काही दिवसांपूर्वीच आगीच्या घटनेने पाच घरांची राखरांगोळी झाली. या आगीची राख उडून जात नाही तोच सेमाडोह येथे लागलेल्या आगीत ३७ झोपड्या खाक झाल्या. मेळघाटात आग लागल्यास चिखलदरा नगर पालिकेच्या एका बंबावर अवलंबून राहावे लागते. त्यानंतर अंजनगावसुर्जी, अचलपूर येथून बंब बोलवावा लागतो. धारणीसारख्या तालुक्याच्या ठिकाणीही बंबाची सुविधा उपलब्ध नसल्याचे आदिवासींचे दुर्दैव आहे. त्यातच टंॅकरची सोय नसल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये तेल ओतल्यासारखी स्थिती मेळघाटात निर्माण झाली आहे. त्यातच संपुर्ण मेळघाटात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे आग लागल्यास बंब कोठून भरून आणावा ही त्यापेक्षाही गंभीर समस्या आहे. 
कोट्यवधी रुपयांचा खर्च मुरला कोठे: मेळघाटात मोठ्या प्रमाणात जलशिवार योजनेतून तलावाचे खोलीकरण, बंधारे आदी कोट्यवधी रुपयांचे कामे करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही या उन्हाळ्यात कोठेच पाण्याचा थेंब दिसत नसल्यामुळे कोट्यवधीचा खर्च नेमका मुरला कोठे असा प्रश्न आहे. 


मे‌ळघाटात दरवर्षी गावांना आगी लागतात. त्यावर उपाययोजना म्हणून अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मेळघाटातील बहुतांश गावे आगीच्या सावटाखाली आहेत. या गावांवर प्रशासनाचे लक्ष असून अशा दुर्घटना घडू नये म्हणून विशेष काळजी घेंण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. - डॉ. उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, धारणी 


मेळघाटातील आगीच्या घटना चिंताजनक 
मेळघाटातील गाव खेडयातील घरे माती कुळाचे असतात. अनावधानाने आगीच्या घटना होवून संसार उद््ध्वस्त होतात. त्यामुळे ही बाब चिंताजनक असून यावर कायम तोडगा काढण्याकरीता प्रयत्न करु. - केवलराम काळे,माजी आमदार 

बातम्या आणखी आहेत...