आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा स्वाभिमानने जाळले बिल बुक तर मनसेने दिले आयुक्तांना निवेदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील उड्डाणपुलाखाली वाहने लावण्यासाठी नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार आहे. महापालिकेने सहा महिन्यांसाठी प्रायोगित तत्वावर 'पे अॅण्ड पार्किंग' मधून वसुली सुरू केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. युवा स्वाभिमानने मनपाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरच आज (१० एप्रिल) दुपारी उड्डाणपुलाखालील 'पे अॅण्ड पार्किंग' दराचे पोस्टर फाडत बिल बुक जाळले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांना निवेदन दिले. 

 

वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता शहरात दोन उड्डाणपुलाची निर्मिती दहा ते बारा वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र मागील दहा ते बारा वर्षात उड्डाणपुलाखाली 'पे अॅण्ड पार्किंग' नव्हती. शहर तसेच बाहेरगावावरुन खरेदीकरीता येणारे नागरिक, व्यापाऱ्यांची वाहने उड्डाणपुलाखाली लावली जात होती. मात्र तेथे देखील वाहने उभी करण्यासाठी मनपाने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादला आहे. उत्पन्न वाढावे म्हणून मनपाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. बडनेरा मार्गावरील कुथे स्टॉप (नमुना) ते मालवीय चौकादरम्यान उड्डाणपुलाखालील जागेत प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरीता 'पे अॅण्ड पार्क' योजना सुरू करण्यात आली आहे. वर्कग्रुप सुशिक्षित बेरोजगार नागरी सेवा सहकारी संस्थेला वसुलीचा कंत्राट देण्यात आला आहे. वाहने पार्क करण्याबाबत दर देखील निश्चित करण्यात आले आहे. याबाबत मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


युवा स्वाभिमानने जाळले बिल बुक, दर पोस्टर फाडले : 
उड्डाणपुलाखाली वाहने लावण्यासाठी सुरू केलेली 'पे अॅण्ड पार्क' योजना म्हणजे महापालिकेची वसुली असल्याचे युवा स्वाभिमानचे म्हणणे आहे. वाहने लावण्याकरीता पैसे वसूल केल्या जात असल्याने युवा स्वाभिमानने मनपाच्या मुख्य प्रवेश द्वारासमोरच लावण्यात आलेले 'पे अॅण्ड पार्क'च्या दराचे पोस्टर आज (१० एप्रिल) दुपारी २ वाजताच्या सुमारास फाडले. 'पे अॅण्ड पार्क' योजनेकरीता कार्यरत युवकांकडून हिसकावत बिल बुके राजकमल चौकात जाळण्यात आली. यावेळी अनुप अग्रवाल, गणेश मारोडकर, निलेश भेंडे, महेश भारती, मंगेश कोकाटे उपस्थित होते. आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 


मनसेने दिले निवेदन: शहरात उड्डाणपुलाखाली सुरू करण्यात आलेली 'पे अॅण्ड पार्क' योजना बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. या मागणीला घेऊन महापलिका आयुक्त हेमंत पवार यांना निवदेन देण्यात आले. याकडे दुर्लक्ष केल्यास शुक्रवार १३ एप्रिलला शहर बंद करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संतोष बद्रे, बच्च्ू रेळे, राम पाटील, बबलू आठवले, प्रवीण डांगे, संजय गव्हाळे, गौरव बांते, सुरेश चव्हाण आदी हजर होते. 
मनपाने घेतलेला निर्णय नागरिकांच्या लागला जिव्हारी,व्यापाऱ्यांमध्येही खदखदतोय असंतोष 
राजकमल चौकात पार्किंगची बिल बुके जाळताना युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते. आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेले मनसे पदाधिकारी. 


नगरसेवकाने केली खंडणीची तुलना 
उड्डाणपुलाखाली सुरू करण्यात आलेली 'पे अॅण्ड पार्क' योजना बंद करण्याची मागणी नगरसेवक ऋषी खत्री यांनी आयुक्त हेमंत पवार यांना निवेदन देत केली. 'पे अॅण्ड पार्क'चे आदेश तसेच करारनामा तातडीने रद्द करावा. नागरिकांकडून अवैधपणे 'पे अॅण्ड पार्क'च्या नावाने खंडणी वसुल करणे बंद करण्याची मागणी त्यांनी केली. नागरिकांना यामुळे भूर्दंड सोसावा लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. 


असे आहेत दर (रुपये) 
तास दुचाकी चारचाकी 
१ ते ३ ५ १० 
१ ते ६ १० २० 
१ ते १२ २० ४० 
मासिक ३०० ६०० 

बातम्या आणखी आहेत...