आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळात न बोलता बाहेर अविवेकी व अविचारी बोलणे हा दुटप्पीपणा : जाेशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आपली मते मांडण्यासाठी महामंडळाचे व्यासपीठ उपलद्ध असताना तिथे "तटस्थ' राहून बाहेर बोलणे हा दुटप्पीपणा अाहे, असा पलटवार अ. भा. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद जोशी यांनी केला. 


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दरवर्षी घेतल्या जाणारी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक यापुढे घेतल्या जाणार नाही. महामंडळच संमेलनाध्यक्षपदाची निवड करील, ही घटना दुरूस्ती ३० जून रोजी िवदर्भ साहित्य संघात झालेल्या विशेष सभेत मंजूर करण्यात आली. यामुळे निवडणूक थांबवून सन्मानपूर्वक अध्यक्षांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर माध्यमांशी बोलताना विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी यामुळे महामंडळाची हुकूमशाही येईल, अशी भीती व्यक्त केली होती. तर माजी संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांनी यात संस्थात्मक पातळीवर राजकारण हाेऊ शकते. निवडणुकीला महामंडळ हा पर्याय नाही, अशी टीका केली होती. यावर महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 


हा संबंधितांचा औचित्यभंग 
काहींनी नव्या घटना दुरूस्ती संबंधातील संपूर्ण निवड प्रक्रियेची माहिती करून न घेताच काही विधाने केली आहेत. त्यांनी पूर्ण माहिती घेऊन ती केली असती तर ते अधिक चांगले झाले असते. मात्र महामंडळाचे सदस्य असणाऱ्या मान्यवरांना महामंडळ सभेचे व्यासपीठ मते मांडण्यासाठी सदस्य म्हणून उपलब्ध आहे तिथे मात्र कोणतीच भूमिका न घेता "तटस्थ' राहायचे, मतच व्यक्त करायचे नाही आणि सार्वजनिकरित्या मात्र अविवेकी, अविचारी आरोपवजा विधाने करणाऱ्या भूमिका घ्यायच्या हा दुटप्पीपणा तर आहेच. शिवाय तो औचित्यभंग देखील आहे, असे जोशींनी स्पष्ट केले. 


संस्थात्मक शिस्तीचा भंग नको 
आपले मत महामंडळाच्या सभेत मांडले असते तर हा निर्णय घेणाऱ्या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनाही त्यांची त्यावरची मते सभेत मांडता आली असती. महामंडळाचे सदस्य असणाऱ्यांनी तरी आपल्या सदस्यत्वाच्या काळात महामंडळाबद्दल वक्तव्य करतांना संस्थात्मक शिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी घेणे हे लोकशाही वर्तन अपेक्षित आहे. लोकशाही व घटनात्मक प्रक्रियेतून विशिष्ट निर्णयाप्रत पोचणाऱ्या सर्व संस्थांनी बाळगलेल्या सामूहिक लोकशाही विवेकाचा अवमान होईल अशी विधाने पदसिद्ध असणाऱ्या महामंडळ सदस्याने करणे निश्चितच अपेक्षित नाही. 

बातम्या आणखी आहेत...