आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यल्प कर्ज वाटप प्रकरण: पाच बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांना 'शोकॉज'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- खरीप हंगामात अत्यल्प कर्ज वाटप केल्याप्रकरणी पाच क्षेत्रीय बँकेच्या व्यवस्थापकांना साेमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'शोकॉज' बजावली. याबाबतचा खुलासा त्वरित करण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर, बँक ऑफ इंडिया, वर्धा, पंजाब नॅशनल बँक, नागपूर, बँक ऑफ बरोडा, नागपूर, इंडियन ओव्हरसीज बँक, नागपूर या बँकांच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांचा समावेश आहे. 


बँक ऑफ महाराष्ट्राचे १६ हजार ४४७ खातेदार असून, २१६ कोटी ३२ लाख रुपये उद्दिष्ट होते. त्यापैकी २ हजार ५६२ खातेदारांना केवळ २२ कोटी ५९ लाख रुपये कर्ज वाटप केले. सद्या परिस्थितीत १०.४४ टक्के कर्जवाटप केले. बँक ऑफ इंडियाचे ६ हजार ९८ खातेदार असून, ८४ कोटी ५४ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यातून ३७१ खातेदारांना २ कोटी ७१ लाख रुपये, असे ३.२१ टक्केच कर्ज वाटप केले. पंजाब नॅशनल बँकेचे एक हजार ३४५ खातेदार असून, १७ कोटी ४६ लाखांचे उद्दिष्ट होते. यातून ७९ खातेदारांना केवळ एक कोटी १७ लाख रुपये म्हणजे ६.७२ टक्के कर्जवाटप केले. बँक ऑफ बरोडामध्ये ६ हजार ४२ शेतकरी सभासद असून, ६५ कोटी २० लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५१० खातेदारांना ६.२२ कोटी इतके म्हणजे ९.५५ टक्के कर्जवाटप केले. इंडियन ओव्हरसीसमध्ये एक हजार ८२ शेतकरी सभासदांना ७ कोटी ८४ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. यातून सध्या केवळ ३.४७ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक कर्ज दिले. 

बातम्या आणखी आहेत...