आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा पोलिसांच्या जाळ्यात; आठवडाभरापासून मुलगी होती बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- शहरालगतच्या पाचडोह पुनर्वसन येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा अखेर आठवडाभरानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई रविवार, दि. २९ एप्रिल रोजी अवधुतवाडी पोलिसांनी कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे केली. सतिष रोकडे वय २४ वर्ष रा. पाचडोह पुनर्वसन असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ तालुक्यातील चापडोह पुनर्वसन येथील २४ वर्षीय सतिष रोकडे याने गावातील एका अल्पवयीन मुलीला सोमवारी पळवून नेले होते. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दि. २४ एप्रिल रोजी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

 

त्यानंतर पोलिसांनी दोघांचाही मोबाइल लोकेशन, टॉवर लोकेशनवरून शोध सुरू केला. त्याचबरोबर सतिष याच्या मित्रांचीही विचारपूस पोलिसांनी सुरू केली होती. मात्र, तो पोलिसांना मिळून आला नव्हता. दरम्यान रविवार, दि. २९ रोजी सतिष त्या अल्पवयीन मुलीला घेवून कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून क्षणाचा विलंब न करता अवधुतवाडी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार आयरे, कर्मचारी समाधान जगताप, मनोज भैरव यांच्यासह मुलांच्या नातेवाइकांना सोबत घेवून पोलिसांनी जोडमोहा गाठले. पोलिसांनी गावात सर्वत्र दोघांचाही शोध घेतला असता ते एका घरी आढळून आले. त्यानंतर दोघांनाही अवधुतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणाची पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केली असून या प्रकरणात आरोपीला सहकार्य कारणाऱ्यांविरूध्द सुद्धा कारवाईचा फास आवळण्याची शक्यता बळावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...