आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फसवणूक प्रकरणी गुजरात मधून आरोपीस अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- गुजरात येथील आरोपीने संधीचा फायदा घेऊन फिर्यादी कडून ओटीपी नंबर बळकावून ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यामधून २ लाख रुपये काढून घेतले या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या चमूने आरोपीस अटक केली असून,आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


प्राप्त माहिती नुसार फिर्यादी प्रशांत कवडुजी भोयर वय २९ रा वासी कोरा ता समुद्रपूर जिल्हा वर्धा हा युवक गुजरात येथील असलेल्या सनराईजर कंटेनर कंपनी डेहरी (गुजरात) येथे नोकरीवर कार्यरत होता प्रशांत भोयर या युवकाचे लग्न जुळल्याने त्याने हिंगणघाट येथील भारतीय स्टेट बँक शाखेत त्याने खात्यात २ लाख रुपये जमा केले होते. दिनांक १५ मार्च २०१८ ते १६ मार्च २०१८ या कालावधीमध्ये आरोपीने त्याच्या खात्यामधून ऑनलाइन पद्धतीने २लाख काढून घेतले असल्याचे ,फिर्यादीस सात दिवसांनी लक्षात आले असता, आरोपी विरुद्ध हिंगणघाट पोलिस स्टेशनमध्ये अप क्रमांक ४२४ /२०१८ कलम ४२० भांदवि सहकलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायदा सुधारीत २००८ अन्वये गुन्हा दाखल करीत तपासाला गती देताच गुजरातेतील फिर्यादी राहते जागेवरून ऑनलाइन पद्धतीने रक्कम काढल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी उमरगाव (गुजरात) येथे जाऊन आरोपी धर्मेंद्रकुमार राजेंद्रप्रसाद वर्मा वय २५ रा पालेगंज पटना बिहार ह मु उमरगाव गुजरात याला चौकशी करिता ताब्यात घेतले असता, आरोपी कडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली आरोपी हा फिर्यादी चा सहकारी असून तो त्याच कंपनी मध्ये काम करीत होता.या प्रकरणी हिंगणघाट पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चमूने आरोपीस अटक केली आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.सदर कारवाई पोलिस अधीक्षक निर्मलादेवी एस यांचे मार्गदर्शनास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पोटे,पोलिस निरीक्षक शिरतोडे यांच्या निर्देशाप्रमाणे अनिल वर्मा, विजय वाजपेयी,राजेंद्र हाडके,कुलदीप टांकसाळे,अमोल आलवाडकर व प्रफुल हेडाऊ यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...