आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैकुंठ एकादशीला उघडले बालाजी मंदिराचे द्वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जय स्तंभचौकातील बालाजी मंदिराची दोन द्वार वर्षातून एकदाच वैकुंठ एकादशीला (पुत्रदा एकादशी) उघडतात. या द्वारातून बालाजींचे प्रवेश (आगमन) होतो, अशी धारणा असल्यामुळे आज या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी सकाळपासून रांगा लावून जगदीश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. सायंकाळीही जयस्तंभ चौकापासून मंदिरापर्यंत भाविकांची रांग होती.

 

तिरुमला येथेही तिरुपती बालाजी मंदिरात आज विशेष उत्सव असतो. यानिमित्ताने १५ ते २० लाख भाविक तेथे दर्शन घेत असतात, अशी माहिती शहरातील बालाजी मंदिरातील पदाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील बालाजी मंदिराच्या दक्षिण आणि उत्तर दिशेचे दोन द्वार आज उघडले. यानंतर पूर्ण वर्षभरच बंद असतात.

 

सकाळी बालाजींची पालखीतून मिरवणूक काढून ती शहरात फिरवली. त्यानंतर परत मंदिरात मिरवणूक विसर्जित झाली. बेलोरा संस्कृत शाळेतील विद्यार्थ्यांचे दिवसभर संस्कृत श्लोक पठणही येथे झाले. गोविंदा मित्र मंडळाने सेवा देत खिचडी, बुंदी, पेढे प्रसादाचे वितरण केले. अटल वकील, रतनलाल डायमा, राजेश हेडा, नारायण उपरकर, नारायण अग्रवाल, रमण डायमा, चेतन चौधरी, व्यास, सुरेश रतावा यांनी कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळली.

 

नेत्रदीपक अन् मोहकफुलांची सजावट
वैकुंठ एकादशीला गायत्री नर्सरीद्वारे बालाजी मंदिरात केली जाणारी फुलांची सजावट विशेष मनोहारी असते. विविधरंगी फुलांपासून रेखीव रांगोळ्या, सुबक माळा, देवतांच्या मूर्ती अन् शुभ चिन्हे काढण्यात आली. यासाठी लाखांवर फुलांचा वापर करण्यात आला. बालाजींना तुळस आवडते म्हणून तुळशीच्या माळाही सर्वत्र पवित्र सुगंध देत होत्या.

 

बातम्या आणखी आहेत...