आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सीईओं'चा न्यायालयात सहा पानी जबाब सादर; परिचर बदली प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषा खत्री. जि.प. सीईओ - Divya Marathi
मनीषा खत्री. जि.प. सीईओ

अमरावती- आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा परिषद सीईओंनी दोन परिचरांची तडकाफडकी मेळघाटात बदली केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यासाठी धाव घेतली. शुक्रवारी (दि.२७ एप्रिल) जिल्हा परिषदेद्वारे विधि अधिकारी अॅड. संजय भांेडे यांनी या प्रकरणी सहा पानी लेखी जबाब न्यायालयात सादर केला. येत्या २ मे रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या प्रकरणी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी आणि शिवसेनेद्वारे सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने उपनिवडणूक अधिकाऱ्यांना परिचर बदली प्रकरणी चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. 


कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत आम्हाला कोणतीही कारणे दाखवा नोटीस न बजावता तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विनंतीशिवाय बदली करता येत नाही. हा आमच्यावर अन्याय आहे, असा ठपका ठेवत परिचर विजय संभलकर व आर.जे.इंगोले यांनी वेगवेगळी याचिका न्यायालयात दाखल केली हाेती. त्यानंतर शुक्रवारी सीईओंना न्यायालयाने उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या वतीने जि.प.विधि अधिकारी अॅड. संजय भोंडे यांनी यांनी सहा पानी लेखी जबाब न्यायालयात सादर केला. या प्रकरणी येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तसेच न्यायालय या प्रकरणी कोणता निर्णय घेणार याबाबत चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...