आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा, विदर्भासाठी २२ हजार कोटींचे पॅकेज!; राज्य सरकारची विधानसभेत घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत याकडे एक प्रकारचा मिनी अर्थसंकल्पच सादर करत मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार १२२ कोटींच्या विविध योजना प्रस्तावित केल्या.


मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने केल्या या घोषणा


सिंचन क्षेत्र :
- १०० कोटींच्या निधीतून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानाच्या मर्यादेत सर्व घटकांना १५% वाढ. यासाठी निधी मिळणार. जलसंधारणासाठी ५०० कोटींचा निधी.
- मराठवाड्यात ३३ हजार शेततळ्यांची निर्मिती केली आहे. आणखी ३० हजार शेततळी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्यांच्या अस्तरीकरणाचे कामही हाती घेण्यात येईल. 
- हिंगोली जिल्ह्यात ७ रोहयो बंधारे,  पाझर तलावांची दुरुस्ती केल्यास १००० टीसीएम साठा होऊन २५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.  


कृषी व कृषिपूरक क्षेत्र :
- औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी उत्पादन संस्थांना शेतमाल मूल्यवर्धनासाठी प्रत्येकी २५ लाखांचे भांडवल. शेतकरी उत्पादक संस्था, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल. 
- परभणीत टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे उच्च प्रतीच्या रोपांची निर्मिती प्रस्तावित. नांदेड जिल्ह्यात पिकांच्या हायब्रीड बियाण्यांच्या निर्मितीसाठी शेडनेट सुविधा. 
- मराठवाड्यात गटशेतीबाबतच्या योजनेची व्याप्ती वाढवून १००० गटांना योजना लागू. औरंगाबाद विभागासाठी १०० कोटींचा निधी. 
- रेशीम उद्योग योजनांना ३० कोटींचा निधी. मत्स्यव्यवसाय विकासासाठी ३० कोटी रुपये.


पर्यटन, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांसाठीही केली तरतूद
- एमटीडीसीचे औरंगाबाद, फर्दापूर, औंढा नागनाथ, नर्सी नामदेव, माहूर, तुळजापूर, वेरूळ येथील पर्यटक निवास 
-  फर्दापुरातील अजिंठा टी जंक्शन, अजंता फूट हिल उपाहारगृह 
-  वेरूळ येथे बॅटरीचलित वाहने 
- अजिंठ्यात इलेक्ट्रिक बस-इलेक्ट्रिक बस चार्जिंग युनिट व शेल्टर विकसित करणे, अजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्रे व निवास आदींसाठी निधी. 
-  मराठवाड्यात अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय.

बातम्या आणखी आहेत...