आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुर: पवनकर कुटुंबातील पाच जणांचा मारेकऱ्याला पंजाबमधून अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानीला हादरवून टाकणाऱ्या पाच जणांच्या हत्याकांडातील फरार आरोपी विवेक पालटकरला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात नागपूर पोलिसांना गुरुवारी यश आले आहे. 


बहीण-मेहुणा व स्वत:च्या मुलासह एकूण पाच जणांचे जीव घेणारा क्रूरकर्मा विवेक पालटकर पंजाबमधील लुधियाना येथे लपला असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्यापासून मागील तीन दिवसांपासून नागपूर गुन्हे शाखेचे पथक तेथेच तळ ठोकून होते. त्याला अटक झाल्याची माहिती नागपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री जाहीर केली. 


पालटकरने १० जूनच्या मध्यरात्रीनंतर बहीण अर्चना, तिची मुलगी वेदांती, पती कमलाकर आणि सासू मीराबाई पवनकरसह स्वत:चा चार वर्षीय मुलगा कृष्णा पालटकर याचीही निर्घृण हत्या केली होती. शहरासह राज्याला हादरवून देणाऱ्या या हत्याकांडातील आरोपीमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. त्यामुळे विवेकला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नागपुरात आंदोलन देखील झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...