आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: अल्पवयीन मुलीसोबत एकाच दिवशी दोन वेळा प्रस्थापित केले शरीर संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अल्पवयीन मुलीवर 23 वर्षीय युवकाने एकाच दिवशी दोन वेळा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आठवीत शिकत आहे, तर आरोपी नवाज अल मोहम्मद इस्माईल मुजावर       हा विवाहीत असून त्याला दोन मुलं देखील आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरूण नवाज अली मूळचा उत्तरप्रदेशातील रहिवाशी असून, तो एमआयडीसीत कामाला आहे. 15 वर्षीय पिडिता आणि नवाज अलीची अल्पावधीतच मैत्री झाली. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पीडिता नवाजच्या रूमवर गेली, तेथे नवाजने बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दुपारी तीन वाजता ती घरी परतली. रात्री पुन्हा आठ वाजेच्या सुमासार ती नवाजच्या रूमवर गेली. नवाजने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमासार मुलगी घरी परतली. आई-वडिलांना संशय आला, परंतु, तिने आपण रस्ता विसरल्याचे सांगितले आणि झोपी गेली. मुलगी आपल्यासोबत खोटे बोलत असल्याचे लक्षात येताच सकाळी वडीलाने दम देत तिची विचारपूस केली, तेव्हा तिने नवाजच्या घरी होते, असे उत्तर दिले. त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली देखील मुलीने दिली. 


प्रकरणाला वेगळे वळण...
तो मला खूप आवडतो आणि मीच त्याला प्रपोज केले अशी कबूली अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली. यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...