आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची बदनामी करणाऱ्या युवकाला पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरजगाव कसबा - युवकाने लग्न करण्याच्या लावलेल्या तगाद्याला नकार देणाऱ्या युवतीचे छायाचित्र सोशल माध्यमांवर व्हायरल करून तिची बदनामी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्रशांत समाधान किरोटे (२२) रा. शेगाव, जि. बुलडाणा असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

प्रशांतची पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरातील युवतीशी मैत्री होती. मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने युवतीला लग्न करण्याची गळ घातली. लग्न न केल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी युवतीने ९ जुलै रोजी शिरजगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला शेगाव रेल्वे स्थानकावरून पळून जाताना अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय स्वप्निल तायडे करीत आहेत. युवकांनी सोशल मीडियाचा गैरवापर करू नये, तसेच मुलींनी अनोळखी युवकांबरोबर मैत्री करू नये, असे आवाहन ठाणेदार कवाडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...