आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर अधिवेशन बंदोबस्तासाठी जाणारी पोलिसांची व्हॅन उलटली; व्हॅनचालक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा - नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने त्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी अमरावती येथून नागपूर येथे जाणारी राज्य राखीव दलाची पोलिस व्हॅन पलटी झाली. ही घटना शनिवारी (दि. ३०) सकाळी ८.१५ वाजता तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्व. लालासाहेब महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातामध्ये चालक एस. एस. चव्हाण (३५), रा. अमरावती यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

नागपूर येथे पावसाळी अधिवेशन होणार अाहे. त्यामुळे बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून (एमएच २७/ बीएक्स ०३६८) क्रमांकाची पोलिस व्हॅन राज्य राखीव दलाच्या ७ कर्मचाऱ्यांची एक तुकडी जात होती. दरम्यान, स्व. लालासाहेब महाविद्यालयाजवळ अचानक चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले व ती पलटी झाली. व्हॅन काळी अंतरापर्यंत घासत गेली. यामध्ये चालक चव्हाण हे जखमी झाले असून, फ्रक्चर झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघतात राज्य राखीव दलाचे ६ कर्मचारी यांना किरकोळ इजा झाली. अपघातात पोलिस व्हॅनचे नुकसान झाले असून, सुदैवाने मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...