आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे हिंदुंमधील हाफिज सईद, कोम्बिंग ऑपरेशनविरोधात कोर्टात जाणार: प्रकाश आंबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सांगली येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे हिंदुंमधील हाफिज सईद असल्याची टीका भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोरेगाव भीमा येथे गेल्या 1 जानेवारी रोजी उसळलेल्या हिंसाचारामध्ये भिडे व हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचा आरोप आज पुन्हा एकदा आंबेडकर यांनी केला.

 

 

कट्टरपणा वाढत चाललाय

हिंदू संघटनांमधील कट्टरपणा वाढत चालला आहे. हिंदुंमध्ये हाफिज सईद जन्माला येत आहेत आणि सरकार यावर काहीही नियंत्रण आणू शकत नाही. संभाजी भिडेसारखे हाफिज सईद अनेक राज्यात आहेत. हे हाफिज सईद एकत्र झाले का, याचा शोध घ्यावा. काही संघटना राज्यात हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने भिडे गुरुजी आणि एकबोटे यांना लवकरात लवकर अटक करावी. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनच्या विरोधात कोर्टात जाणार आहोत. ज्यांनी ही कारवाई केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...