आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे प्रवीण पाेटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; काँग्रेसला उमेदवाराची प्रतीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी (२७ एप्रिल) नामांकन दाखल केले. भाजपकडून नामांकन दाखल झाले असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराची अद्याप प्रतिक्षा कायम असल्याचे राजकीय चित्र आहे. अधिसूचना घोषित झाल्यापासून केवळ एकच नामांकन दाखल झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. 


अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत एकूण १९ जणांकडून नामांकन अर्जांची उचल करण्यात आली. एकट्या काँग्रेसकडून अनेक जणांनी अर्जाची उचल केल्याने उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे प्रवीण पोटे यांनी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी प्रामुख्याने गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, माजी आमदार अरुण अडसड, माजी खासदार अनंतराव गुढे, महापौर संजय नरवणे, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर, जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड, सुनील खराटे, प्रा. प्रशांत वानखडे, प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. संजय तीरथकर, किरण पातुरकर, मनपा स्थायी समिती सभापती विवेक कलोती, उपमहापौर संध्या टिकले यांच्यासह नगरसेवक, नगराध्यक्ष आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपसह २१३ सदस्य आपल्या बाजूने असल्याचे पोटे यांनी बोलताना सांगितले. विधान परिषद निवडणुकीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण ४३८ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. अन्य उर्वरित मतदार कोणाच्या बाजूने मतदान करणार हे महत्वपूर्ण राहणार आहे. काँग्रेसकडून शरद निकम, अनिल माधोगडीया, अरुण वानखडे अश्या मातब्बर मंडळीकडून अर्जाची उचल करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसकडून दाखल होणाऱ्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेससह अनेक भाजप विरोधी पक्षाचे लाेकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी मागील निवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी स्थिती नाही. भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षाकडून एकमोठ बांधली जात असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...