आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ज्येष्ठ नागरिकां'ची सुरक्षा; पोलिस होतील 'केअर टेकर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार दिवसांपूर्वी सेवानिवृत्त शिक्षिका शैलजा निलंगे यांचा त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूने खुन केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला . त्यामुळे पोलिस आयुक्तांनी शनिवारी ठाणेदारांना आदेश देवून जेष्ठांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्याबाबत सूचवले. या उपाययोजनांनी पोलिसही ज्येष्ठ नागरिकांचे 'केअर टेकर' होतील.

 

शहरात सद्यःस्थितीत जवळपास १४० ज्येष्ठ नागरिक पोलिसांच्या नोंदी आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांची संख्या यापेक्षा जास्त अाहे. त्यापैकी किती ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहतात, किती ज्येष्ठ दाम्पत्य आहे. ती माहिती पोलिस घेणार आहे. हीच संख्या पूर्णपणे समोर यावी म्हणून सर्व ठाणेदारांनी मनपाकडून आपल्या हद्दीच्या मतदारयाद्या घ्याव्यात. या यादीनुसार वॉर्ड निहाय, गल्लीनूसार ज्येष्ठांची संख्या काढावी. त्यांना अपत्ये किती आहे, नाही, याबाबत माहिती घ्यावी. ज्या घरांत ज्येष्ठ दाम्पत्य आहेत मात्र त्यांची काळजी घेणारे घरात कुणी नाही, त्याची नोंद घ्यावी. ज्येष्ठांचा मुलगा, मुलगी आहे का? असल्यास कुठे आहे, काय करतात याची माहिती घ्यावी. त्यांच्याकडे कुणी भाड्याने राहतात काय? राहत असल्यास कोण राहतो, त्यांचे नाव, त्यांचा व्यवसाय, त्यांची वर्तणूकबाबत माहिती घ्यावी. अशा ज्येष्ठांच्या घरात कामासाठी कोण येतात, त्यांची वर्तणूक कशी आहे. याबाबत माहिती घ्यावी. ही माहिती गोळा झाल्यावर ज्येष्ठ नागरिक जेथे राहत असतील तेथील बीट अंमलदार, बीटमधील अधिकारी, सीआर व्हॅनमधील पोलिस यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी जेष्ठांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करावी, ते सुरक्षित आहेत किंवा नाही, त्यांना काही भीती आहेत का? ही माहिती घेवून त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न करावेत. याबाबत रजिस्टर तयार करून नोंदी घ्याव्यात. यासह इतरही काही मुद्दे पोलिस आयुक्तांनी ठाणेदारांना सुचवले आहेत.  


सज्जन' व्यक्तीची संपर्क व्यक्ती म्हणून निवड करणे आवश्यक
ज्येष्ठ नागरिक ज्या भागात, गल्लीत राहतात. त्या जेष्ठांच्या घरांच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींपैकी चांगल्या व्यक्तीची संपर्क व्यक्ती म्हणून निवड करावी. जेणेकरून ज्येष्ठांना काही अडचण आल्यास, पोलिसांना संबधित ज्येष्ठांबाबत माहिती पाहिजे असल्यास संपर्क व्यक्तीची मदत होईल.

 

२०१५ मध्ये घडले होते धारिया हत्याकांड : शहरातील किशोर नगरमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मधुमालती धारिया यांचा घरात जावून खुन झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांना अद्यापही मारेकरी मिळाला नाही. त्यासुध्दा घरात पतीसह राहत होत्या. मात्र घटनेच्या दिवशी त्यांचे पती घरात नव्हते.

 

पोलिस बनतील ज्येष्ठांचा आधार
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आहेत, काही नव्याने आखल्या आहेत. या उपाययोजना राबवण्याबाबत ठाणेदारांना सूचना दिल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिसही ज्येष्ठांना सुरक्षा देवून आधार देणार आहेत.
- दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त.


या मुद्द्यांप्रमाणे माहिती संकलित करणार आहे
१. पोलिस ठाण्याचे नाव
२. ज्येष्ठ व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक
३. स्वत:चे घर आहे का.
४. भाड्याने राहतात का.
५. मुले मुली कुठे राहतात.
६. अपत्य नसल्यास त्यांची देखरेख कोण करतो व संबधित ज्येष्ठांचे देखरेख करणाऱ्यासोबत नाते काय.
७. काळजी घेणारा कोण, यासोबतच इतर दोन ते तीन महत्वाचे मुद्दे आहेत.

बातम्या आणखी आहेत...