आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना याला त्याच्या पत्नीसह गडचिरोली पोलिसांनी बल्लारपुरातून अटक केली. एका कुख्यात नक्षल्यास सपत्नीक अटक होणे हे पोलिसांचे मोठे यश आहे. रामन्ना व त्याची पत्नी पद्मा हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच त्यांनी ही माहिती चंद्रपूर पोलिसांना दिली. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी सापळा रचून बल्लारपूर येथून रामन्ना व त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले.
रामन्नाचे मूळ नाव श्रीनिवास विठ्ठलअण्णा मडरू (६५) असे असून तो सिकंदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचे नाव पद्मा ऊर्फ समाक्का ऊर्फ मयुरी ऊर्फ लता ऊर्फ मिनती डोबय्या कोडापे (५५) आहे. रामन्ना १९७६-७७ पासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे. नक्षल्यांनी त्यावेळी रामन्नाकडे जनसंघटनाचे काम सोपविले होते. पुढे १९९५ पासून त्याच्याकडे तांत्रिक विभागाचे काम देण्यात आले व नंतर तो या विभागाचा प्रमुख झाला. रायफली तयार करून त्याचे प्रशिक्षण देणे ही कामे रामन्ना करीत होता. शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पद्मा कोडापे ही १९९२ मध्ये टिपागड दलममध्ये असताना धानोरा तालुक्यातील चकमक, २२ मार्च १९९६ रोजी बालाघाट परिसरातील डेरीमुरम येथील चकमक, २२ एप्रिल १९९६ मध्ये त्याच परिसरातील सिंदेगाव येथील चकमक, १९९८-९९ मध्ये बस्तर चकमकीत तिचा सहभाग होता. तिच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षीस हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.