आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: युवतीवर अत्याचार करून अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मैत्रीतून प्रेम व त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून एका २३ वर्षीय युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर तब्बल तीन वेळा युवतीचा गर्भपात करून घेतला. इतकेच नाही तर शनिवारी (दि. ३०) रात्री अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्कार, तसेच गर्भपात घडवून आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला. 


पवन मिठेलाल श्रीवास (२३, रा. बजरंग टेकडी, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. जून २०१७ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातच राहणाऱ्या एका युवतीसोबत पवनची ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, शारिरिक संबंध प्रस्थापित झाले. दोघांनीही लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, पवनने युवतीकडून लग्न करण्यासाठी टि. सी. (शाळा सोडल्याचा दाखला) मागितला होता. युवतीने त्याच्याकडे टि. सी. दिली होती. या दरम्यान तीन वेळा युवतीचा गर्भपातही करवून घेण्यात आला. मात्र पवन लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यामुळे युवतीने त्याला २८ जूनला फोन करून टिसी परत मागितली. त्यावेळी त्याने ३० जूनला राजापेठ चौकात टिसी घेण्यासाठी युवतीला बोलवले. युवती आली, त्यानंतर पवनने युवतीला स्वत:च्या घरी नेले. पवनच्या घरी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पवनने अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. 


दरम्यान त्याचवेळी पवनने युवतीच्या आईला फोन करून सांगितले की, तुमची मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे युवतीची आई पवनच्या घरी पोहोचली. ती मुलीला घेवून थेट राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पवनविरुद्ध शनिवारी उशिरा रात्री गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पवन पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. पवन हा बजंरग दल कार्यकर्त्यांचा मित्र असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...