आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन सलग पाच दिवस अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- रात्रीच्या सुमारास वीस वर्षीय तरुणीला पळवून नेऊन सलग पाच दिवस अत्याचार करण्यात आल्याची घटना चिखलदरा पोलिस ठाण्या अंतर्गंत उघड झाली आहे. याप्रकरणी तीन ते पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 


२९ एप्रिल रोजी पीडित तरूणी रात्री बारा वाजताच्या सुमारास आई-वडीलांसह घरात झोपली होती. दरम्यान रात्री ती लघुशंकेसाठी बाहेर आली असता दोन तरुणांनी तिचे तोंड दाबून अपहरण केले. त्यानंतर एका गावात नेऊन तरुणीला डांबून ठेवण्यात आले. तेथे एका आरोपीने अत्याचार केला. दुसऱ्या आरोपीला नकार दिल्याने पीडित तरुणीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर सलग पाच दिवस तरुणीवर अत्याचार करण्यात आले. चिखलदरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. 

बातम्या आणखी आहेत...