आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर नातेवाईकानेच केला अत्याचार, सोशल मीडिव्दारे मागितले आक्षेपार्ह छायाचित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहितेची अचलपूर जवळ असलेल्या नारायणपूर येथे एका लग्नात नात्यातील एका ३२ वर्षीय युवकासोबत ओळख झाली. ओळखीनंतर त्या युवकाने शहरात विवाहितेच्या घरी येवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच महिलेचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडिव्दारे मागितले. त्याने धमक्या दिल्यामुळे महिलेने जवळपास दीड वर्ष त्याच्याकडून होणारा अत्याचार सहन केला. अखेर शनिवारी (दि. ९) रात्री विवाहितेने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून त्या नातेवाईकाविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


अमोल बबनराव वाईनदेशकर (३२, रा. नारायणपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. २५ जानेवारी २०१७ ला पीडित विवाहिता ही एका लग्न समारंभासाठी नारायणपूरला गेली होती. त्याचठिकाणी तिची ओळख अमोलसोबत झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. यामधून अनेकदा अमोल या विवाहितेच्या घरी अमरावतीला येत होता. त्यानंतर त्याने विवाहितेच्या घरीच तिचा पती घरात नसल्याची संधी साधून अत्याचार केला. त्याने आपण लग्न करू, असेही आश्वासन दिले. काही दिवसानंतर अमोलने मारण्याची धमकी दिली. त्रास वाढल्यामुळे विवाहितेने पतीसह शनिवारी पोलिस ठाणे गाठले. 

 

बातम्या आणखी आहेत...