आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतवाड्याच्या वसतिगृहासाठी जागा हस्तांतरणाला मान्यता; राज्यमंत्री कांबळे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाला एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत आदिवासी विभागाला कळविण्यात आले अाहे. या जागेच्या हस्तांतरणाला मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी  विधानसभेत केली.    


विदर्भातील अामदार बच्चू कडू यांनी परतवाडा येथे आदिवासी वसतिगृह बांधण्यासाठी जागेचे हस्तांतरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, आदिवासी विभागाकडून वसतिगृह मागणीचा प्रस्ताव सादर करणे तसेच सामाजिक न्याय व आदिवासी विभाग या दोन्ही वसतिगृहांच्या एकत्रित वास्तूमांडणी आराखडा सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तो प्राप्त होताच त्याचे अवलोकन करुन जागा हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. मात्र, त्यावर कडू यांचे समाधान झाले नाही. ‘आराखडा तयार आहे’, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर हस्तांतरणाला मान्यता देण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...