आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३० कोटी कलाकारांची करणार नोंद, कलाकारांना युनिक आयडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूरसह विदर्भातील संपूर्ण कलाकारांची अद्ययावत यादी तयार करून त्याची डायरी प्रकाशित करण्याचा संकल्प येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने केला होता. मध्य दक्षिणीच्या या संकल्पनेची दखल घेत केंद्रीय सांस्कृितक मंत्रालयाने हा प्रकल्प संपूर्ण देशभर अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता देशभरातील ३०   कोटी कलाकारांची संपूर्ण माहिती संकलीत करून त्याची डायरी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती मध्य दक्षिणीचे संचालक डाॅ. दीपक खिरवडकर यांनी दिली. केंद्राच्या अखत्यारितील सात राज्यातील एक लाख कलाकारांची नोंदणी येत्या ३० जूनपूर्वी करायची आहे. दक्षिण मध्यची नवीन वेबसाईट बनवून त्यात सर्व कलाकारांचा बायोडाटा टाकू असे केंद्राने जाहीर केले होते. कलाकार डिक्शनरीचा उपक्रम केवळ या केंद्रापूर्ता सीमित होता. मात्र दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मध्य दक्षिणीचा उपक्रम केंद्रीय मंत्रालयाने उचलून धरली आहे. भारतातील कलाकारांची असा डेटा बेस तयार करावी असे ठरविले आहे. 


लवकरच कलाकार नोंदणी सप्ताह 
भारतातील सर्व विधांच्या सर्व कलाकारांची आता नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठीचा आवश्यक फॉर्म सर्व कलाकारांना दक्षिण मध्य केंद्रातर्फे येत्या २-३ दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल. हा नोंदणी फॉर्म सर्व कलाकारांना भरून द्यायचा आहे. यात कलाकाराची पूर्ण माहिती नोंदवली जाईल. या नोंदणीसाठी एक कलाकार नोंदणी सप्ताह घेण्यात येणार आहे. यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात येणार आहे. त्यानंतर नाेंदणी करण्यात येणार अाहे.

 
अर्ज आॅफलाईन आणि आॅनलाईनही 
नोंदणी करणाऱ्या कलाकारांना केंद्र सरकारतर्फे युनिक आयडी देण्यात येणार आहे. आयडीच्या आधारे देशभरातील कलाकाराची संपूर्ण माहिती केंद्र सरकारला उपलब्ध राहिल. नोंदणी अर्ज आॅफलाईन आणि आॅनलाईनही उपलब्ध राहिल. कलाकाराची वैयक्तिक माहिती, त्यांची वैशिष्ट्ये, अातापर्यतची सादरीकरणे, आदी माहिती यात राहिल. ग्रामीण, आदिवासी, लोककला, शहरी, ग्रामीण, हौशी, व्यावसायीक अशा सर्व प्रकारच्या कलाकारांची नोंदणी करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...