आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चशिक्षित तरुण संघासोबत यावेत म्‍हणून विशेष \'दक्ष\'ता, देशभरात करणार विस्तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - शहरी आणि निमशहरी भागात संघाचा प्रचार- प्रसार आहे. पण महानगरीय तसेच ग्रामीण भागात संघाला अपेक्षित प्रतिसाद नाही. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागात बोलीभाषा संवर्धनातून संघ कार्याचा विस्तार करण्याची योजना रा. स्व. संघाने आखली आहे. बोलीभाषांच्या संवर्धनाचा प्रस्ताव अ. भा. प्रतिनिधी सभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती देऊन रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी तसे स्पष्ट संकेत दिले.

 

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शुक्रवारी प्रतिनिधी सभेचे उद््घाटन झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कृष्णगोपाल यांनी निवेदन केले. महानगरातील उच्चशिक्षित तरुण संघासोबत येण्यासाठी विशेष "दक्ष'ता घेण्यात येत असल्याची माहिती डाॅ. कृष्णगोपाल यांनी या वेळी दिली. देशात हजारो बोलीभाषा आहेत. या बोलीभाषा लुप्त होत चालल्या आहेत. बोलीभाषेतून संस्कृती, परंपरा आणि विचारांचे जतन होते. बोलीभाषेमुळे भाषा समृद्ध होते. बोलीभाषेत विपुल साहित्य लेखन झाले आहे. पण या बोलीभाषा लुप्त होत असल्याने हा ठेवाही नष्ट होण्याची भीती आहे. यामुळे संघ बोलीभाषांचे संवर्धन करणार आहे. त्यासाठी पुढील वर्षभरात देशभरातील स्वयंसेवक बोलीभाषा जतन करण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी काम करणार आहे. बोलीभाषा संवर्धनाच्या कार्यासाठी स्वयंसेवक गाव आणि तांड्यावर जाणार आहेत.

 

तरुणांसाठी संघ "दक्ष' : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तरुणांचा कल वाढत आहे, असे या वेळी सांगण्यात आले. नागपूर, पुणे. मुंबई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली, मुंबई या महानगरांत तरुणांची संघातील उपस्थिती वाढावी किंवा तरुणाई संघासोबत जुळण्यासाठी विशेष "दक्ष'ता घेण्यात येत असल्याचे डाॅ. कृष्णगोपाल यांनी या वेळी बोलताना सांगितले.

 

देशभरात ८३,३४८ शाखा
नागालँड, मिझोरम व जम्मू-काश्मीरचा काही भाग सोडल्यास देशात ९५ टक्के जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. देशभरात ३७ हजार ठिकाणी संघाच्या ५८,९६७ शाखा लागतात. १६,४०५ साप्ताहिक मिलन आणि ७,९७६ मासिक बैठका होतात. तिन्ही मिळून एकूण ८३,३४८ शाखा लागत असल्याची माहिती डाॅ. कृष्णगोपाल यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...