आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या अघाेषित संपाचा प्रवाशांना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वेतनवाढीसह आपल्या इतर मागण्यांसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी अचानक अघोषिक संप पुकारल्यामुळे नागपूर येथील मध्यवर्ती बसस्थानकासह विभागातही संपाचा परिणाम दिसून आला. कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारलेल्या संपाचा फटका प्रवाशांना बसला. यामुळे प्रवाशांची खूपच तारांबळ उडाली. 


गुरुवारी मध्यरात्री अचानक एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकरल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचे नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर दिसून आले. सकाळ पासूनच बसची ये-जा लक्षणीय रित्या कमी झाल्याचे दिसून आले. बसस्थानकावरही मोजक्याच बसगाड्या उभ्या असलेल्या दिसून आल्या. तर बसच्या प्रतीक्षेत प्रवाशांना कित्येक तास ताटकळत राहावे लागले. 
संपाची परिस्थिती हाताळण्यासाठी एकेका अधिकाऱ्याला पालक अधिकारी म्हणून एकेका बसस्थानकाची जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर विभागात संपाची तिव्रता काही ठिकाणी खूप जास्त तर काही ठिकाणी एकदम कमी दिसून आली. सर्वच बसस्थानकात रात्री बाहेरगावहून आलेल्या बसगाड्या तेवढ्या सोडण्यात आल्या. मात्र स्थानिक बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्याने प्रवासी बसस्थानकातच अडकून बसल्याचे पाहायला मिळाले. 


नागपूर विभागात संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. भंडारा जिल्ह्यात ७० ते ८० टक्के वाहतूक प्रभावित झाली. तर गोंदिया जिल्ह्यात तिरोडा डेपो १०० टक्के, तुमसर डेपो ९० टक्के, पवनी ९० टक्के बंद. गोंदिया डेपोची वाहतूक १०० टक्के तर साकोली डेपोची वाहतूक ८० टक्के सुरू असल्याची माहिती मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व चिमूर डेपोतील वाहतूक फारशी प्रभावित झाली नाही. मात्र राजूरा डेपोची वाहतुक ५० ते ६० टक्के प्रभावित झाल्याचे दिसून आले. विभागात सुमारे ७० ते ८० टक्के वाहतूक प्रभावित झाल्याचे दिसून आले. नागपुरात इमामवाडा, घाटरोड, उमरेड, काटोल, रामटेक व सावनेर डेपोची वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर गणेशपेठ मुख्य बसस्थानक व मोरभवन बसस्थानकातील वाहतूक ५० टक्के प्रभावित झाल्याचे दिसून आले. 

बातम्या आणखी आहेत...