आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

439 संशोधकांना 'आचार्य' पदवी प्रदान; गुणवत्तायादीतील 105 जणांना 'सुवर्ण' प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने चौतिसाव्या दीक्षांत समारंभात पश्चिम विदर्भातील ३६ हजार ७७० विद्यार्थ्यांना आज (२३ फेब्रुवारी) पदवी प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या ४३९ संशोधकांना आचार्य (पीएचडी) पदवीने सन्मानित करण्यात आले. शिवाय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १०५ सुवर्ण पदकांनी सन्मानित केले. 


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून उन्हाळी २०१७ मध्ये ६२१ परीक्षांचे संचालन करण्यात आले, त्याला ३ लाख १० हजार ४८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८७ हजार ०३९ तर माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी होती. हिवाळी २०१७ मध्ये ५६७ परीक्षा घेण्यात आल्यात, त्याला २ लाख ३ हजार ४८४ परीक्षार्थी होते. या दीक्षांत समारंभामध्ये ३६ हजार ७७० पदवीकांक्षींना व ४८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य तसेच रोख पुरस्कार देऊन महाराष्ट्र लाेकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, कुलगुरू डाॅ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते सन्मानित केले. 


सुवर्णपदके प्राप्त विद्यार्थी : करुणा बंडू शिरसाट (वाड्:मय स्नातक) हिला २, कु. मेघा गुणवंतराव बावणे (एम.ए. गृहअर्थशास्त्र), कु. मनिषा राजेंद्रराव कडू (एम.ए. अर्थशास्त्र) हिला २, कु. पूजा गजेंद्र गायकवाड (एम.ए. भारतीय संगीत), सचिन अरुण जोशी (एम.ए. मराठी) याला ६, कु. निहारीका गजानन घोडेराव (एम.ए. संस्कृत), कु. शितल ओंकार वरठी (एम.ए. भूगोल), कु. शबनम कासीम सय्यद (बीजेएमसी), कु. मदीहा महेरोश मो. साकिब (विज्ञान स्नातक) हिला ५, गोकुल सुरेश बजाज (एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र) याला २, दिव्या संतानी (एम.एस्सी. रसायनशास्त्र) हिला २, कु. मुनाझ्झा सिद्दीकी मिर्झा निसार बेग (गृहविज्ञान स्नातक) हिला २, कु. तेजल पुंसे (वाणिज्य स्नातक) हिला ४, कु. सपना नरेश पिंजानी (एम.कॉम.), पुजा लालवाणी (एम.बी.ए.) हिला ३, कु. तृप्ती वसंतराव घाटोळ (एम.जे.एम.सी.) हिला २, धनश्री दत्तात्रय कोठेकर (एम.एस्सी. पदार्थ विज्ञान), सारिका परशराम सुरवाडे (एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र), सारिका विष्णुपंत वनवे (एम.ए. समाजशास्त्र), वैशाली सुभाषराव कोरडे (एम.ए. इतिहास), सबा नाज अब्दुल खालीद सौदागर (एम.एस्सी. प्राणीशास्त्र), पायल वसुले (एम.एस्सी. गणित), विशाखा आसटकर (एम.एस्सी. गणित), ऋतुजा दीपक माई (आयु:शल्य विज्ञान स्नातक) हिला २, आर्फिन आफ्ताबाली खोजा (आयु:शल्य विज्ञान स्नातक), पलक चिरानिया जुगल (आयु:शल्य विज्ञान स्नातक) हिला ३, भक्ती केतन मेहता (आयु:शल्य विज्ञान स्नातक), कस्तुरी प्रमोद भिसे (आयु:शल्य विज्ञान स्नातक), नेहा राजेंद्र बुटोलिया (एम.बी.ए.), कु. ईश्वरी मनोज सावजी (बी.टेक कॉस्मेटीक्स स्नातक), श्री विशाल प्रभाकरराव वानखडे (एम.ए. राज्यशास्त्र), ओमेश्वरी रविंद्र बंड (एम.ए. इंग्रजी) हिला २, श्री नितीश अनिल शर्मा (विधी स्नातक) याला ३, श्री अमिर इस्त्रायल शेख (विधी पारंगत) याला ३, प्रशिक साहेबराव गवई (विधी पारंगत), वर्षा वर्मा (वास्तुविज्ञान स्नातक), क्रिपालराणी रामदास भिसेकर (विधी पारंगत), कु. नम्रता नंदकिशोर रायबोले (विज्ञान स्नातक-रसायनशास्त्र), कु. अरशी परवेज दोकडीया (एम.ए.-इंग्रजी वाड्:मय), पुजाताई डाहाके (एम.ए.-मराठी वाड्:मय), प्रिती सहारे (वाड्:मय स्नातक-संस्कृत), कु. पुजा शालेग्राम महेशकर (वाड्:मय स्नातक-संस्कृत) हिला २, कु. नाजीया परवीन नसीब खाँ (वाड्:मय स्नातक-उर्दू), तेजश्री दत्ताजी निचडे (वाड्:मय स्नातक-पाली), कु. भावना बंडू शिरसाट (वाड्:मय स्नातक-राज्यशास्त्र), प्रविण ज्ञानदेव पाटील (टेक्सटाईल इंजिनिअरींग), कु. आरती ओंकार सावळे (ग्रंथालय व माहिती शास्त्र स्नातक), श्री शुभम भिमराव पोलाडे (ग्रंथालय व माहिती शास्त्र पारंगत), कु. पुजा दिलीप डायमा (गृहविज्ञान पारंगत), कु. नाझिया नाझिश मो. सलीम (शिक्षण स्नातक) हिला २, नितिका सतीषकुमार शर्मा (श०ारीरिक शिक्षण पारंगत), भावेश अनिल क्षिरसागर (भेषजी स्नातक) याला २, प्रियल काजळकर (अभियांत्रिकी स्नातक) हिला ५, कु. गार्गी श्रीकांत मोहरील (अभियांत्रिकी स्नातक) हिला ३,ु. अपेक्षा राजेंद्र उमाटे (अभियांत्रिकी स्नातक) हिला ३, प्रशांत विनायक जामोदकर (अभियांत्रिकी स्नातक), कु. टूबा शबनम मो. मकरम (अभियांत्रिकी स्नातक) हिला २, सय्यद इम्रान अली रहेमत अली (आयुर्वेदाचार्य स्नातक) याला २, अदिती सुनिल झुनझुनवाला शेख साजिद शेख हुसेन (तांत्रिक स्नातक), राणी रमेश कोल्हे (एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र) यांना सुवर्ण पदके प्राप्त झाली. 


गांभीर्याने अभ्यास केल्याचे फलीत : मदीहा महेरोश ीब 
परीक्षेच्या काळात सातत्यपूर्ण आणि गांभीर्याने अभ्यास केल्याने यश मिळाल्याचे विज्ञान स्नातक परीक्षेत मुलींमध्ये सर्वाधिक पाच सूवर्ण पदके पटकाविणारी कुमारी महिदा महेरोश मो. साकीब हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले. अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून महिदा हिने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. विज्ञान स्नातक परीक्षेत सर्वाधिक पाच सूवर्ण, दोन रौप्य पदक प्राप्त केल्याने आनंदी असल्याचे तीने सांगितले. परीक्षेच्या दरम्यान अभ्यासाव्यतिरिक्त काहीच आवडत नव्हते. अभ्यासाचा असा कोणताच निश्चित वेळ नव्हता. जेवण्याकडे देखील दुर्लक्ष होत होते. भविष्यात गणित विषयात एमएसस्सी करण्याचा मानस महिदाने व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...