आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती रक्कम अपहार प्रकरणी 70 संस्थांवर गुन्हे दाखल; राजकुमार बडोले यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सामाजिक न्याय व आदिवासी विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र राज्यातील अनेक संस्थांनी या रकमेचा अपहार केला. या संपूर्ण गैरव्यवहाराची विशेष चौकशी पथकाने चौकशी केली असता राज्यातील १७०४ संस्थांनी १८२६.८७ कोटींचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. यापैकी आदिवासी विकास विभागातील दोन आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडील ६८ अशा ७० संस्थांवर गुन्हे दाखल केले अाहेत. तसेच वसूलपात्र रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या संस्थांमध्ये मराठवाड्यातील काही संस्थांचाही समावेश अाहे.  


हसन मुश्रीफ, अजित पवार, शशिकांत शिंदे, बच्चू कडू, आदी ३१ सदस्यांनी या गैरव्यवहाराबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी गैरव्यवहाराची सविस्तर माहिती दिली आहे. याप्रकरणी विशेष चौकशी पथकाच्या अहवालातील एकूण १७०४ संस्थांच्या लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने विश्लेषण व पडताळणी करण्याची कार्यवाही समाजकल्याण आयुक्तांमार्फत सुरू अाहे.    


अनियमिततेच्या एकूण १८२६.८७ कोटी रकमेपैकी आतापर्यंत ९६.१६ कोटी रुपये वसूल केले असून ते कोशागारात भरण्यात आले आहेत. ६८५.४१ कोटी इतक्या अग्रिम रकमेचे समायोजन करण्यात आले असून ७० संस्थांवर गुन्हे नोंद करून २८ कोटी ३० लाख रुपये वसूलीची कार्यवाही सुरू आहे. काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने आणि औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्याने गुन्हे दाखल केले नसल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, या संस्थांवर होणार कारवाई...

बातम्या आणखी आहेत...