आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने शाळेच्या पार्किंगमध्ये घुसला टिप्पर, 9 विद्यार्थी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक टिप्पर बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पार्किगमध्ये घुसला. यावेळी एका स्कूल व्हॅनसह चार वाहनांना धडक दिल्याने 9 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत.या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने टिप्पर चालकाला खाली खेचून बेदम मारहाण केली. पोलिसांनी वेळीच पोहचून त्याला अटक केल्याने त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

 

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे 7.30 च्या सुमारास स्कूल व्हॅनचे चालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. विद्यार्थ्यांना सोडून ते परत जात होते. तर, काही व्हॅनचालकांनी शाळेच्या आवारातील पार्किगमध्ये स्कूल बस, व्हॅन लावल्या होत्या. अचानक एक टिप्पर वेगात व्हॅनवर येऊन धडकला. त्यावेळी या व्हॅनमधील विद्यार्थी उतरून शाळेच्या आत जात होेते. त्यामुळे 9 विद्यार्थ्यांना दुखापत झाली. दरम्यान, ज्या वेळी हा अपघात झाला त्या वेळी अनेक पालक आपापल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही मॉर्निंग वॉक करणारे तर काही रस्त्याने जाणारे-येणारे होते. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. परिणामी अनेकांनी तेथे धाव घेतली. टिप्पर चालकाच्या हलगर्जीपणे हा अपघात झाल्याचे लक्षात आल्याने संतप्त जमावाने त्याला खाली खेचला आणि बेदम चोप दिला. माहिती कळताच पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी जमवाची कशी-बशी समजूत काढून आरोपी टिप्परचालकाला ताब्यात घेतले. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...