आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा; कर्जमाफी, नुकसान भरपाई गाजणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कर्जमाफीचा तत्काळ दिलासा देण्यात आलेले अपयश, डिसेंबर महिन्यात कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झाली असताना अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याच्या मुद्यावर पावसाळी अधिवेशनात सोमवारी विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.   


पहिला आठवडा सिडको जमीन घोटाळ्यावरील आरोप-प्रत्यारोपांवरून गोंधळात गेला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून रविवारी याबाबतचे संकेत देण्यात आले. गेल्यावर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापही सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नाही. हिवाळी अधिवेशनात सरकारने कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली. मात्र, सरकार, विमा व बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. अशातच नव्या कर्जवाटपची आकडेवारी विरोधकांच्या दृष्टीने समाधानकारक नाही. खरिपाच्या पेरण्या सुरू असताना सरकारचे कर्जवाटपाचे लक्ष्य  जेमतेम २१ टक्केच पूर्ण झाले असून केंद्रीय बँकांबाबत खूप तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा घडवून सरकारला यानिमित्ताने उघडे पडण्याचे विरोधकांचे प्रयत्न राहतील. यावरून सोमवारीही गोंधळचीच परिस्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


नागपूर पालिकेचे वाभाडे निघणार   
नागपुरातील शुक्रवारच्या अतिवृष्टीमुळे विधिमंडळातील कामकाजावर परिणाम झाला. दोन्ही सभागृह तहकूब करावे लागल्याची नामुष्की सरकारवर आली. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर भाजपला घेरण्याची संधीही विरोधकांसह शिवसेनेला चालून आली आहे. अधिवेशनात त्याचेही पडसाद उमटण्याचे संकेत विरोधकांकडून मिळत आहेत. या साऱ्याचा सामना सरकार कसे करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...