आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नक्षलवादाच्या लढाईत सर्वाधिक नुकसान आदीवासींचे झाले. कारण नक्षल कॅडरमध्ये आदीवासी आहे. पोलिसांतही आदिवासी आहे आणि या दोघांच्या लढाईत नाहक भरडला जाणारा आदीवासीच आहे. आदीवासींच्या हक्काची, त्यांच्या न्यायाची लढाई लढत असल्याचा दावा नक्षली नेहमीच करतात. पण इतक्या वर्षात आदीवासींच्या पिढ्या बरबाद होऊनही आदीवासी तिथल्या तिथेच राहिला. दरम्यान पोलिस विभाग मात्र नक्षल्यांचा खोटारडेपणा लक्षात आणून देण्यात यशस्वी झाल्यामुळे आता लोक उघडपणे नक्षल्यांविरूद्धच्या लढाईत समोर येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
घरे आणि रोजगार : २००९ पासून मुख्य प्रवाहात येऊ ईच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना राबविण्यात येत आहे. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. आतापर्यत ५०० च्या वर नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले अाहे. आत्मसमर्पीत नक्षल्यांना भूखंड तसेच घरांचे वापट केले जाते. आतापर्यत ११४ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून ६३ घरकुलांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहे. १७ जणांना बैलजोड्या देण्यात आल्या. १६ जणांना किराणा दुकान तर ५८ जणांना पानठेला टाकण्यासाठी अर्थसाहाय करण्यात आले. ३६ महिला नक्षलींना शिलाई मशिनचे तर २३ जणांना शेळी वाटप करण्यात आले. १३ जणांना आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. नक्षल वाद्यांचा दुटप्पीपणा उघड झाला असून यापुढे आदीवासी नक्षल्यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे शिंदे म्हणाले.
येथे सुरू आहे उच्च शिक्षण
गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मणराव (जिल्हा करीमनगर, आंध्र प्रदेश) याचा मुलगा अमेरिकेत मायक्रोसाॅफ्ट कंपनीत नोकरीला आहे. मल्लोनुला वेणुगोपाल उर्फ अनिद उर्फ अभय व्यंकटेश (जिल्हा करीमनगर, आंध्र प्रदेश) याचा मुलगा उच्च शिक्षण पूर्ण करून आय. टी. कंपनीत नोकरीला आहे. प्रशांत बोसे उर्फ किसनदा उर्फ निर्भय मुखर्जी (कोलकाता, पश्चिम बंगाल) याचा मुलगा सध्या कोलंबीया विद्यापीठात शिकत आहे. तर दीपक उर्फ मिलिंद बाबूराव तेलतुंबडे (यवतमाळ) याचा भाऊ आयआयएम, गोवा येथे समाजशास्राचा वरिष्ठ प्राध्यापक असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.