आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पतीला लैंगिक समस्या, पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- एका उच्चशिक्षित युवतीचे लग्न मागीलवर्षी शहरात राहणाऱ्या एका शिक्षक युवकासोबत झाले. यावेळी युवतीच्या वडीलांनी लग्नाच्यावेळी आवश्यक ते स्त्री धन व हुंडा दिला. लग्नानंतर अनेक दिवस उलटले तरीही शिक्षक पती हा त्याच्या पत्नीसोबत 'पती पत्नीप्रमाणे संबंध' ठेवत नव्हता. इतकेच नाही तर त्याने अनेकदा अनैसर्गिक कृत्य   केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. याबाबत सासरच्या मंडळींना सांगितले तर त्यांनीही विनयभंग करून मारहाण केली. पतीला लैंगिक समस्या लग्नापूर्वीपासूनच होती, असे असूनही लग्न जुळवताना ही बाब माझ्यापासून तसेच माझ्या वडीलांपासून लपवून ठेवल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरूवारी (दि.२४) मध्यरात्री शिक्षक पतीसह सासू, सासरे, दिर व दिराणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पती, सासरे व दिराला अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. 


कोदर्यापूर तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या एका एमएससी झालेल्या युवतीचे २४ सप्टेंबर २०१७ ला फ्रेजरपुरा पेालिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शिक्षक युवकासोबत लग्न झाले. लग्नानंतर मुलगी तिच्या सासरी गेली. मात्र दहा दिवस उलटले तरी पती तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत नव्हता. याबाबत विवाहितेने तीच्या सासुला सांगितले. त्यामुळे सासूने तिच्या मुलाला समजावले. तर पतीने रागारागाने येवून मारहाण केली इतकेच नाही तर विवाहितेसोबत अतिशय किळसवाणे असे अनैसर्गीक कृत्य केले. त्यानंतर पुन्हा सासूला सांगितले तर, सासूने विवाहितेला म्हटले की, तुझी माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझा मुलगा आहे, तसा आहे. तुला त्याचा स्वीकार करावा लागेल. त्यानंतर विवाहिता व तिचा पती तो ज्या गावाला शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्या गावात राहायला गेले. त्या ठिकाणी विवाहितेने एका शाळेत शिक्षीकेचे काम सुरू केले मात्र पती व सासू, सासरे, दिर, देराणी यांनी सदर नोकरी सोडण्यास सांगितली, त्यामुळे विवाहितेने नोकरी सोडली. 


दरम्यान ६ मे २०१८ रोजी विवाहिता तिच्या बहीणीला पहायला पाहूणे येत असल्यामुळे माहेरी आली. त्यावेळी तिचा पतीसुद्धा सोबत आला. त्याच ठिकाणी पुन्हा पतीने यापूर्वीप्रमाणे अनैसर्गीक कृत्य केले. ओरडली तर याच ठिकाणी गाडून टाकेल, अशी धमकीसुद्धा दिली. दरम्यान, विवाहितेला आपल्या पतीमध्ये 'लैंगिक समस्या'असल्याचे जाणवले. म्हणून तिने सासरच्या मंडळींना रुग्णालयात नेवून पतीवर उपचार करावे, असे म्हटले कारण मला मुल पाहिजे, असे तिने सांगितले. त्यावेळी सासूने म्हटले की, तुला मुल पाहीजे तर सासरा व दीर आहे ना, असे म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २० मे २०१८ ला सुद्धा सासरच्या मंडळींनी घरातच विनयभंग केला, असा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच पतीला लग्नापूर्वीपासून लैंगिक समस्या असल्याची माहिती दडवून आमचा विश्वासघात केला. अशी तक्रार फ्रेजरपुरा पोलिसात दिली. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध अनैसर्गीक कृत्य करणे, विश्वासघात, विनयभंग तसेच हुंडा प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


हनीमुनच्या रात्री पुस्तक वाचून केली टाळाटाळ 
लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री पती जवळ न येता पुस्तक वाचत बसला होता. याबाबत विवाहितेने पतीला म्हटले तर त्याने तीला सांगितले कि, आपण एकमेकांना आधी ओळखू, नंतर प्रेम करू आणि त्यानंतर मधुचंद्र. हे अनेक महिने असेच सुरू होते. रात्रीच्या वेळी नेहमीच पती पुस्तक वाचत बसत असल्याचाही आरोप विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...