आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध, विधानसभेत आमदार सुनील प्रभु यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच असून तो कायम राहील, असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत सांगितले.  माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी बुलेट ट्रेन आणि नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले. शिवसेनेचा विरोध खरा की केवळ दाखविण्यापुरता असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी बुलेट ट्रेन आणि नाणार हे दोन्ही प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारे असल्याचे सांगत त्यांना शिवसेनेचा कायम विरोध राहील, असे सांगितले. 


बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक वाड्या व बागा बाधित होणार आहेत. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेनचा प्रस्ताव आर्थिक दृष्टीने परवडणारादेखील नाही. त्याऐवजी मुंबई व उपनगरातील रेल्वेचे जाळे सुधारण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. नाणार प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होणार असल्याने त्यालाही आमचा विरोध कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...