आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दरोडेखोरांना नागपुरात पकडले; मोझरी पेट्रोलपंपावरील दरोडा,८ पैकी ६ यवतमाळचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गुरूकुंज मोझरीपासून जवळच असलेल्या माेरे यांच्या पेट्रोल पंपावर ३१ मे च्या पहाटे अडीच वाजता दरोडा टाकणाऱ्या सहा जणांना रविवारी रात्री नागपुरातून पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. याचवेळी एक दरोडेखोर यवतमाळ कारागृहात आहे तर अन्य एक पसार आहे. या टोळीतील आठपैकी सहा सदस्य यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या टोळीतील तीन दरोडेखोर कुख्यात असून त्यांच्यावर यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता एलसीबीचे पीआय सदानंद मानकर यांनी वर्तवली आहे. 


करण परोप्टे (२४, रा. राणी अमरावती), पवन मंडाळे (२३,रा. पंचगव्हाण), प्रमोद शिंदे (२४, रा. आष्टी, ता. कळंब), रवींद्र शेळके (२४,रा. करळगाव जि. यवतमाळ), स्वप्नील रघुनाथ परतेकी (२६, रा. बोर्डा, ता. तिवसा जि. अमरावती) आणि पीयूष तुळशिदास देवपारे (२२,रा. जानकीनगर, शेगाव नाका अमरावती) यांना नागपुरातील गोधनी मार्गावरील एका फ्लॅटमधून रविवारी पकडले. याचवेळी दरोड्यात आणखी दोघांचा सहभाग होता. त्यामधील अविनाश भगवान लंगोडे (रा. यवतमाळ) याला दरोड्यानंतर यवतमाळ पोलिसांनी अवैध पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे सद्या तो यवतमाळ कारागृहात आहे. 


दरोडा टाकण्यासाठी वापर केलेली एक मारुती रिट्झ कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही रिट्झ कार स्वप्नील परतेकीने आणली होती. तो याच कारवर चालक म्हणून कार्यरत होता. तर पीयूष देवपारे हा टोळीला अमरावतीत मदत करतो. मोझरी येथे दराेडा टाकण्यापुर्वी शहरातील शेगाव नाका भागात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या टोळीचा मुख्य सूत्रधार करण परोप्टे असून, तो यवतमाळमध्ये टोळी चालवतो. घटनेच्या दिवशी चौघे कारने तर उर्वरित चौघे दोन दुचाकीने तिवसा पोहोचले. त्यानंतर त्यांनी मोरे पेट्रोल पंपावर दरोडा घातला. मात्र दरोडेखोरांनी कोणताही सुगावा घटनास्थळी सोडला नव्हता. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र,पोलिसांनी टोलनाक्यावरील सीसीटिव्ही फुजेट तपासून या टोळीला शोधून काढले आहे. 

बातम्या आणखी आहेत...