आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साॅफ्टबाॅल कॅचर प्रतीक डुकरेचा सन्मान; आंतरराष्ट्रीय स्तरावर देखणी कामगिरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या साॅफ्टबाॅल ज्युनिअर विश्वचषकात कॅचर म्हणून अग्रमानांकन मिळविणारा खेळाडू प्रतीक डुकरेचे दि.२० जुलैला शहरात आगमन झाल्यानंतर त्याचा विविध क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी, आरडीआयके महाविद्यालयाद्वारे सन्मान करण्यात आला. साॅफ्टबाॅलसारख्या खेळाच्या शहरात फारशा सुविधा नसतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर देखणी कामगिरी केल्याबद्दल प्रतीकवर फुले उधळली. 

आंतरराष्ट्रीय साॅफ्टबाॅलमध्ये प्रतीकने भारताला १० वे स्थान िमळवून िदले. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी प्रतीकचे स्वागत करण्यासाठी मुख्य चौकांमध्ये गर्दी केली होती. त्याने अप्रतिम कामगिरी केल्याचे समाधान त्याचे वडील शरद व आई अर्पिता डुकरे यांनी व्यक्त केले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. शहरातील साईनगर, गोपाल नगर, राजकमल चौकात विलास इंगोले यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्याचा सत्कार केला. 

शहरभर फिरली अभिनंदन फेरी 
जिल्हा साॅफ्टबाॅल संघटना आयोजन समिती व रामकृष्ण महा. दारापूरद्वारे प्रतीकची शहरत अभिनंदन फेरी काढण्यात आली. सकाळी प्रतीकचे बडनेरा स्थानकावर आगमन झाले. तेथून ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापर्यंत या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम बडनेरा येथील आरडीआयके महाविद्यालयात प्रतीकचे स्वागत करण्यात आले. प्रा. गडीकर, डाॅ‌. सुमेर ठाकूर, डाॅ. संजय थोरात, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अतुल पाटील, विद्यार्थी व क्रीडाप्रेमी यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम राजकमल चौकात झाला. येथे फटाक्यांची आतषबाजी फुलांची उधळण तसेच ढोल ताशांच्या गजरात खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी महापौर विलास इंगोले यांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर फेरीचा समारोप विद्यापीठात झाला. 

बातम्या आणखी आहेत...