आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ओबीसी मोर्चात सोनार समाजाने सहभागी व्हावे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गाला नियमानुसार २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक असताना केवळ २ टक्के आरक्षण देऊन केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने ओबीसी प्रवर्गावर अन्याय केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे या अन्यायाचा निषेध करण्याकरिता व ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण बचाव समिती ९ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. या मोर्चात सोनार समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 


मोर्चाचे नियोजन व या मोर्चातील सोनार समाजाचे सहभागाकरिता सुवर्णकार समाजाची बैठक ३ जुलै रोजी संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते ९ जुलैच्या ओबीसी मोर्चात बहुसंख्येने सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. सदर बैठकीस लक्ष्मीकांत लोळगे व आरक्षण बचाव समितीच्या सदस्यांनी संबोधित केले. सदर बैठकीस नानाभाऊ हर्षे, बाळासाहेब सज्जनवार, सारिका मस्के, मोना देवगीरकर, प्रीती गोगटे, श्याम मंडकमाळे, गजेंद्र मंडकमाळे, अविनाश बानोरे, डॉ. संजय सांबाजवार, दिलीप ढोमणे, राजेश खरवडे, राहुल चिंचमलातपुरे, महेश मानेकर, भारती देवगिरकर, वैशाली लोळगे, प्रियंका गोडे, जयश्री उदावंत, माधवी लोळगे, वैशाली देवगिरकर, रंजना गोगटे, सुभाष मस्के, नंदकुमार गोगटे, नितीन जावळकर आदी उपस्थित होते. बैठकीस गोपाल ढोमणे, सीमा बिन्नोड, चारूलता पावसेकर, अशोक अर्धापुरे, रमेश मंडकमाळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. 

बातम्या आणखी आहेत...