आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर!!! राज्‍य कर्मचा-यांना दिवाळीपुर्वीच लागू होणार सातवा वेतन आयोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांना दिवाळी पुर्वीच सातवा वेतन आयोग लागू करण्‍यात येणार, अशी माहिती राज्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्‍यामुळे पुढील काही महिन्‍यात राज्‍यातील शासकीय कर्मचा-यांच्‍या पगारात घसघशीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. राज्‍यातील सुमारे 17 लाख कर्मचा-यांना याचा लाभ मिळेल. यात जिल्‍हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पोलिस, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


दोनच दिवसांपूर्वी आमदार विक्रम काळे यांनी यासंबंधी सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून राज्‍यातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्‍याची मागणी केली होती. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा अशी मागणी कर्मचा-यांतर्फेही करण्‍यात येत होती.  आमदार काळे यांच्‍या पत्राची तातडीने दखल घेत त्‍यांना लिहिलेल्‍या उत्‍तरात मुनगंटीवार यांनी समितीचा अहवाल ४ महिन्यांत शासनाला प्राप्त होईल. यंदा दिवाळी पूर्व सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. अखेर आज बुधवारी राज्‍य कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच सातव्‍या वेतन आयोगाचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...